जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या सौ.सविता शंकर तोडकर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी कोळा गटातून रणशिंग फुंकले आहे.
कोळा पंचायत समिती गणातून एक जिद्दी आणि खंबीर नेतृत्व समोर येत आहे. जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या सौ.सविता शंकर तोडकर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी कोळा गटातून रणशिंग फुंकले असून मैदान मारणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. केवळ सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आणि जनतेसाठी हीच ओळख असलेल्या सविता तोडकर यांनी आजवर निष्ठेची ढाल आणि कष्टाची तलवार घेऊन समाजकारणाचे मैदान गाजवले आहे.कोळा गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. कोळा परिसरात सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे सौ सविता शंकर तोडकर होय. पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास विजयाचा गुलाल उधळण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. सांगोला तालुक्याचे माजी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि कोळा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे रोखठोक मत सौ.सविता शंकर तोडकर कोळा पंचायत समिती गण इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गट यांनी शिवकाळ न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले. राजकारणात हार जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे सौ.सविता तोडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे यापूर्वीही त्यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या कोळा ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणांगणात अत्यंत अटीतटीची झुंज दिली आहे. परंतु विजयाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांनी जनसेवेचा झंजावात कधीही थांबवला नाही. पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने सामान्यांच्या प्रश्नांसाठी सविता तोडकर अहोरात्र झटत राहिल्या. सांगोल्याचे माजी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या विचारधारेतून त्यांनी कोळा परिसरात विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.




0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ