होलार समाज यंग ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी आबासाहेब गुळीग यांची नियुक्ती.
होलार समाज यंग ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी आबासाहेब गुळीग यांची नियुक्ती. सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील युवा नेतृत्व आबासो गुळीग हे सामाजिक चळवळीतील एक सक्रिय सहभागी असणारे युवक नेतृत्व असून प्रचंड असा जनसंपर्क आणि मित्रपरिवार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.समाजातील अन्यायाविरुद्ध चीड असलेले हे व्यक्तिमत्व नेहमी सत्याच्या बाजूने लढताना दिसत आहे.त्यामुळे त्यांची होलार समाज यंग ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्ष पदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांनी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष हेगडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन स्वागत केलं .विविध लोकहिताच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे सोबत घेऊन सामाजिक कार्य करणारे आबासाहेब गुळीग हे सांगोला तालुका रिपब्लिकन सेनेचे सांगोला तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत.तसेच बुद्ध भीमराज सामजिक संस्थेचे संचालक म्हणून कार्य करीत आहेत.



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ