Breaking News

हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांची प्रतिक्रिया


हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आप प्रशांत कांबळे यांची तीव्र प्रतिक्रिया 

नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उद्देशून स्पष्ट इशारा दिला की, “मतदान आमच्या बाजूने नाही केले तर तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत”. त्याचबरोबर भाजपचेआमदार चंद्रकांत पाटील यांनीही “तिजोरीचा मालक आम्हीच आहोत आणि चाव्या तुमच्याकडे वॉचमन म्हणून दिल्या आहेत” असे वक्तव्य केले. या दोन्ही विधानांनी लोकशाहीचा आत्मा दुखावला असून, नागरिकांना नोकर समजून सत्ता चालवण्याची मानसिकता स्पष्ट करते.सत्ताधाऱ्यांचा तिजोरीवर मालकी हक्काचा दावा लोकशाही की लूटशाही?तिजोरीच्या मालकीचा खरा हक्क हा जनतेचा आहे. जनता ही तिजोरीची मालक असून निवडून आलेले प्रतिनिधी हे फक्त तिचे 5 वर्षा साठी नोकरदार आहेत. परंतु आज हेच नोकर मालक बनण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेच्या अहंकारातून हुकूमशाहीकडे वाटचाल होताना शासनकर्ते सर्वसामान्यांनाच धमकावताना दिसतात.संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाही मूल्यांची पायमल्लीउद्या संविधान दिन आहे. या संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वतंत्रपणे मतदानाचा अधिकार दिला आहे, जो कोणत्याही दबाव, धमकी किंवा स्वार्थासाठी वापरला जाऊ नये. पण आज आपण बघतो, की मताच्या जोरावर सत्तेत बसल्यानंतर, हजारो कोटींच्या निधीचा गैरवापर करून, स्वतःची तिजोरी भरण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत. हा सरळसरळ लोकशाहीवरील प्रहार आहे.
जनतेला नोकर मानण्याची मानसिकता धोकादायकजनतेकडे चावी देणं म्हणजे सत्ता जनतेची आहे, हे संविधान सांगते. पण चावी देऊनही स्वतःला मालक म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांची ही विचारसरणी ही लोकशाहीच्या विरोधात आणि हुकूमशाहीच्या बाजूने आहे. जनता ही तिजोरीची खरी मालक आहे आणि सत्ताधारी केवळ नोकरदार, हे त्यांना पुन्हा आठवण करून द्यावी लागेल.आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष व सामाजिक न्याय विभाग प्रमुख प्रशांत कांबळे यांनी या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला असून म्हटले आहे.सत्ताधाऱ्यांनी मतदारांचा अपमान थांबवावा. संविधानाने दिलेला मताधिकार हा कोणत्याही धमकीपेक्षा मोठा आहे. नोकरदार लोकप्रतिनिधी तिजोरी लुटण्याचे संकेत देत आहेत. लोकशाही वाचवायची आहे की तिजोरीआजचा असली प्रश्न हाच आहे. ही तिजोरी जनतेची ठेवायची की सत्ताधाऱ्याची हे जनतेने आता ठरवलं पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांची प्रतिक्रिया

हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आप प्रशांत कांबळे यांची तीव्र प्रतिक्रिया  नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार...