अखिल गुरव समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश गुरव
अखिल गुरव समाज संघटना सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश गुरव. पाचेगाव खुर्द तालुका सांगोला येथील महेश मुरलीधर गुरव यांची नुकतीच अखिल गुरव समाज संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवा आघाडीच्या उपाध्यक पदावर नियुक्ती करण्यात आली..राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले युवा नेतृत्व महेश गुरव हे भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे सांगोला तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत.भाजपाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे सांगोला तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या साथीने महेश गुरव आपले सामाजिक व राजकीय कार्य दमदारपणे करीत आहेत.धडाडीने काम करणारे युवा नेतृत्व म्हणजेच शांत, संयमी युवा नेतृत्व महेश गुरव होय...अतिशय तळमळीने गुरव समाजातील सर्वच कार्यक्रमात भाग घेऊन सतत सक्रिय काम करतात.एका समाजसेवक कार्यकर्त्याला अखिल गुरव समाज संघटनेने न्याय दिला असल्याची भावना सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.महेश गुरव यांच्या अखिल गुरव समाज संघटना सोलापूरच्या जिल्हा उपाध्यक पदी नियुक्तीमुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे.केवळ राजकारणच नाही तर समाज कारणाचं मिशन उचलल आहे सर्वसामान्य नागरिक,महिला,ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रश्नावर प्रामुख्याने महेश गुरव काम करताना दिसतात.थेट संवाद साधणे ही त्यांची कार्यशैली आहे.सर्व सामान्य जनतेला विविध प्रकारचे दाखले काढून देणे तसेच प्रशासकीय कामामध्ये मदत करणे ह्या कामात महेश गुरव सगळ्यात पुढे असतात.यासोबतच पारंपरिक धार्मिक विधी करण्याची कार्ये देखील महेश गुरव करतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा