पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीद पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार तुकाराम पाटील
पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीद पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार तुकाराम पाटील सांगोला तालुका शेकाप पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीद पंचायत समिती गणा मधून आपण चालू वेळची पंचायत समिती निवडणूक लढवणार असे मत जुजारपूर गावचे युवा नेते तुकाराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय पदांचे आरक्षण प्रशासनाकडून नुकतेच जाहीर झालेले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक मंडळी जोमाने कामाला लागले आहेत. जुजारपूर मधील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तुकाराम पाटील हातीद पंचायत समिती गणा मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तालुका शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास आपण ही निवडणूक जोमाने लढवणार असे मत त्यांनी व्यक्त केले.उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना तुकाराम पाटील यांनी सांगितले तुकाराम पाटील जुजारपूर,हातीद,गुणापवाडी,जुनोनीभागातील प्रसिद्ध युवा नेते आहेत.यापूर्वीही त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुजारपूर चे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदावर काम केले आहे. तुकाराम पाटील हे स्वच्छ प्रतिमा, शांत आणि संयमी स्वभावाचे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून युवकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पाटील कुटुंबाने शेकाप ची पताका खांद्यावर घेऊन स्वर्गीय आबासाहेबांबरोबर निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे समाजसेवेचा वारसा तसेच हातीद गणातील जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर असल्याने पक्षाने संधी दिल्यास आपण निश्चितपणे ही निवडणूक लढवून विजयश्री नक्की खेचून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हातिद पंचायत समिती गण हा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे.राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे...सांगोला तालुक्यातील हातीद पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे.या गणामध्ये इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पहायला मिळत आहे..या रणधुमाळीत अग्रेसर नाव म्हणजेच जुजारपूरचे युवक नेते तुकाराम पाटील होय .हातिद पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून मतदारसंघातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे...प्रामुख्याने युवक उमेदवारांमध्ये ही लढत होईल अशी चिन्हे दिसत आहेत..शेतकरी कामगार पक्ष आपली ताकद टिकवून ठेवणार का ?भाजपचे कमळ फुलणार.. हे येणाऱ्या काळात कळेलच...नक्की गुलाल कोणाचा हे सर्वस्वी मतदारराजा ठरवणार आहे..समजातील सर्वच घटकात तुकाराम पाटील यांचा जनसंपर्क आहे.त्यांनी हातिद पंचायत समिती सदस्यपद निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा