*आरटीई 25 टक्के राखीव शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू करा : आप पालक युनियन*
*आरटीई 25 टक्के राखीव शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू करा : आप पालक युनियन*
आरटीई शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे खाजगी शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. मागच्या शैक्षणिक वर्षात त्याची प्रवेश प्रक्रिया मागील वर्षी डिसेंबर १५ ला सुरू झाली होती. परंतु यंदाच्या प्रवेशाबाबत अजून आदेशच निघाला नसल्यामुळे आम आदमी पार्टी पालक युनियन तर्फे राज्य शिक्षण संचालक यांना निवेदन देण्यात आले. डिसेंबर व जानेवारी मध्ये सीबीएसई व इतर बोर्डांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते. या शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागा भरण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली तर पालकांसाठी द्विधा मनस्थिती तयार होते. लॉटरी सिस्टीम मुळे प्रवेशाची खात्री नसते अशा वेळेस आर टी इ ची लॉटरी आधी काढली तर प्रवेश न मिळालेल्या पालकांना इतरत्र प्रवेश देणे सुलभ होते. यासाठी ही प्रक्रिया डिसेंबर मध्ये सुरू होणे गरजेचे असते. यावर्षी अजूनही यावर आदेश न निघाल्यामुळे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी, हनुमंत शिंदे आदींनी शिक्षण संचालक शरद गोसावी, सहसंचालक रमाकांत काठमोरे यांची भेट घेऊन पालकांच्या अडचणी सांगितल्या. पालकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी वेळ लागतो. आधार कार्ड, उत्पन्न दाखला इत्यादी मिळण्यास बऱ्याचदा तांत्रिक अडचणी येतात. यामुळे शाळा नोंदणी लवकर सुरू होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रभरातून साधारण एक लाख प्रवेश होतात तर त्यासाठी तीन लाख पालक अर्ज करतात. पुण्यामध्ये १९००० प्रवेश असतात व त्यास साठ हजार पेक्षा जास्त अर्ज केले जातात. मोठ्या संख्येवर पालक या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत असतात असे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.दोन वर्षांपूर्वी सरकारने ही प्रक्रिया बदलण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले होते. त्यामुळे त्यामध्ये बदल करणे अपेक्षित नाही असेही मुकुंद किर्दत म्हणाले.आप पालक युनियन/ आम आदमी पार्टी


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा