हातीद येथे रविवारी श्री दत्तगुरु यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहन शुभारंभ
रविवारी हातीद येथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील
सोलापूर जिल्ह्यातील हातीद गावात हभप दत्तात्रय आण्णा भंडगे व भंडगे परिवाराच्या वतीने बनविण्यात आलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये श्रीगुरुदेव दत्त यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण येत्या रविवारी होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन भंडगे परिवाराकडून केले आहे. दत्त मंदिराबाहेर श्री हनुमान व श्री गणेशाच्या मूर्ती बसविण्यात येत आहेत. हातीद (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील वारकरी सांप्रदायचे सदस्य व पंढरपूर येथील संत नामदेव महाराज फडावरील फडकरी असणाऱ्या भंडगे कुटुंबाकडून गेल्या अनेक वर्षांपासून श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा संपूर्ण खर्च या परिवारातील सदस्यांकडून केला जातो.या परिवाराने गेली ४१ वर्षे आपल्या - घरासमोरील उंबर वृक्षाखाली श्री दत्त - यांचा फोटो ठेवून जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही अतिशय श्रद्धेने ते हा सप्ताह साजरा करत होते. विशेष म्हणजे भंडगे कुटुंबातील सर्वजण माळकरी असून भजना मध्ये गायन, तबला वादन, पखवाज वादनकरीत असतात. सध्या याच ठिकाणी भंडगे कुटुंबाने सुमारे पंधरा लाख रुपये खर्चुन भव्य असे श्री दत्त मंदिर उभारले आहे. त्यामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी पावणेदोन लाख रुपये किंमतीची पंढरपूर येथून मूर्ती आणली आहे. शुक्रवारी दि. २८ रोजीदुपारी दोननंतर गावातून या मूर्तीची धार्मिक पद्धतीने सवाद्य मिरवणूक नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. रविवार दि. ३० रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी नूतन दत्त मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण हभप माधव महाराज व मुकुंद महाराज नामदास यांच्या उपस्थितीत व कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील मठाधिपती आनंदगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हभप विष्णू महाराज केंद्रे, विष्णू महाराज जाधव, भास्कर महाराज पवार उपस्थित राहणार आहेत.
२८ नोव्हेंबर ते। या वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त दि ते ५ डिसेंबर अखेर भंडगे परिवाराकडून श्री गुरुचरित्र व श्री ज्ञानेश्वरी या धार्मिक ग्रंथाचे पारायण, अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. यासाठी व्यासपीठ चालक म्हणून हभप अनिकेत डुबुले महाराज तर हभप बिरा महाराज बंडगर (घेरडी), केशव महाराज हेगडे (सोनलवाडी), संतोष महाराज तळसकर (कोल्हापूर), शिवाजी महाराज साळुंखेवाळेखिंडी), नामदेव महाराजांचे १७ वे वंशज एकनाथ महाराज नामदास (पंढरपूर), रामहरी महाराज खंडागळे (कोळे) तसेच श्री गुरु माऊली मुरारी महाराज नामदास यांची काल्याचे कीर्तन सेवा होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन भंडगे परिवारातर्फे करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा