कुंदन बनसोडे यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद
प्रभाग ३ मध्ये प्रचारात बहुजन समाज पार्टीची मुसंडी उमेदवार कुंदन बनसोडे यांच्या हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन प्रभाग क्रमांक ३ ब मधून प्रचारामध्ये बहुजन समाज पार्टीने चांगलीच मुसंडी मारली आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, रस्ते, गटारी, पथदिवे, शौचालय आदि सोयी सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या पोहचून पारदर्शक कारभार करण्यावर अधिक भर देत, उमेदवार कुंदन बनसोडे यांच्या हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून केले जात आहे.
सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टी मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. इतर राजकीय पक्षांना सामोरे जाण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार देखील मोठ्या शर्यतीने कामाला लागले आहेत. बहुजन समाज पार्टीचे उमेदवारांना मतदारांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक तीन ब मधून कुंदन बनसोडे या उमेदवारांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचेही सांगितले जात आहे.राजकारणाच्या पटलावर विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चालत असलेल्या प्रचार यंत्रणेमध्ये बहुजन समाज पार्टीने देखील सक्रिय सहभाग नोंदवत जे आजपर्यंत इतरांना जमले नाही ते आम्ही करून दाखवू, प्रभागातील लोकांना नगरपालिकेच्या सर्व सोयी सुविधा पुरवण्यामध्ये कधीही कमी पडणार नाही. आलेला प्रत्येक निधी पारदर्शकपणे राबवत प्रभागात विकासाचा मॉडेल उभा करू, यासह नगरपालिका कर्मचाऱ्यांना देखील जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. यामध्ये प्रभागातील नागरिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकांना सोबत घेऊन आम्ही विकासाचे धोरण राबवू असा विश्वास उमेदवार कुंदन बनसोडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा