३१ डिसेंबर २०२५

केरेवाडीच्या मातीतील कर्तृत्वाचा तेजस्वी सूर्य, रमेश पाटील यांचा जन्मोत्सव!*केरेवाडी,तालुका कवठेमहांकाळ


 *लोकसेवेचा 'पारस': केरेवाडीच्या मातीतील कर्तृत्वाचा तेजस्वी सूर्य, रमेश पाटील यांचा जन्मोत्सव!*केरेवाडी,तालुका कवठेमहांकाळ,जिल्हा सांगलीजिद्द, चिकाटी आणि माणुसकीच्या त्रिवेणी संगमातून शून्यातून विश्व निर्माण करणारा एक लोकधिमती महानायक म्हणजे केरेवाडीचे सुपुत्र श्री. रमेश नामदेव पाटील. 'ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन'च्या माध्यमातून यशाचे शिखर सर करणाऱ्या या 'लोकनेत्या'चा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या संघर्षातून समृद्धीकडे गेलेल्या थक्क करणाऱ्या प्रवासाचा हा शब्दाविष्कार...

*नागज फाट्यावरील 'संवाददूत' ते यशस्वी उद्योजक*

रमेशरावांचा प्रवास हा केवळ व्यावसायिक प्रगतीचा आलेख नसून तो एका जिद्दीचा महाग्रंथ आहे. मिरज-पंढरपूर मार्गावरील नागज फाटा ही त्यांच्या कर्तृत्वाची पहिली प्रयोगशाळा ठरली. ज्या काळात जग 'कनेक्ट' होण्यासाठी धडपडत होते, तेव्हा त्यांनी सुरू केलेले 'एसटीडी बूथ' हे केवळ दुकान नव्हते, तर ते हजारो विलग झालेली मने जोडणारा माणुसकीचा पूल होता.

*ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाचे 'भागीरथ'*

दूरदृष्टी लाभलेल्या रमेश पाटील यांनी काळाची पावले ओळखून ग्रामीण भागात 'डिजिटल क्रांती'चे बीज रोवले. शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या कामाला गती देण्यासाठी त्यांनी आणलेली 'फॅक्स' सुविधा त्याकाळी परिसरासाठी वरदान ठरली. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा वेळ आणि कष्ट वाचवणारे रमेशराव खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी 'डिजिटल युगाचे देवदूत' ठरले. तंत्रज्ञानाचा हा स्पर्श केरेवाडी आणि नागज परिसराच्या विकासासाठी एक नवी पहाट घेऊन आला.

*कर्तृत्वाचे 'ऐश्वर्य' आणि सेवाव्रती वृत्ती*

'ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन'च्या माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असली, तरी त्यांचे पाय सदैव केरेवाडीच्या मातीशी घट्ट जोडलेले आहेत. १९९५ मध्ये विकास सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा राजकीय व सामाजिक प्रवास आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे.

*वारीचा वसा:* पंढरीच्या पांडुरंगाप्रती असलेली भक्ती ते वारकऱ्यांच्या सेवेतून व्यक्त करतात. वारीच्या वाटेवर तहानलेल्यांना पाणी आणि भुकेलेल्यांना तृप्त करण्यात त्यांना ईश्वरी आनंद मिळतो.

*संवेदनशील समाजसेवक:* केवळ नफा न पाहता समाजाचे ऋण फेडण्याची वृत्ती हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे.

शुभेच्छांचा मळा फुलला!

एका यशस्वी उद्योजकाची शिस्त आणि एका समाजसेवकाचे हळवे मन जपणारे रमेश नामदेव पाटील हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केरेवाडीसह संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

*"कष्टाच्या घामाने शिंपली त्यांनी माती,*

*माणुसकीच्या नात्याने जोडली शेकडो नाती,*

*यशाच्या शिखरावरही नम्रता ज्यांच्या ठायी,*

*अशा 'रमेशरावांच्या' कीर्तीचा सुगंध दाहीदिशी राही!"*

या जनसेवकाला उदंड आणि सुदृढ आयुष्य लाभो, हीच ई

श्वरचरणी प्रार्थना!

२४ डिसेंबर २०२५

चंद्रभागा फाउंडेशन या शैक्षणिक संकुलात क्रीडा महोत्सव चे आयोजन

 

आज आपल्या चंद्रभागा फाउंडेशन याशैक्षणिक संकुलामध्ये क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले नागठाणे गावचे विद्यमान युवा सरपंच माननीय श्री सागर पाटील सर व सौ मनीषा येडेकर मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पिके पाटील सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साळुंखे मॅडम यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. अतिशय सुंदर आणि आनंददायी वातावरणामध्ये या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले.

त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख पाटील मॅडम यांनी केले. व क्रीडा विभागाचे सर्व कामकाज क्रीडा विभाग प्रमुख नदाफ मॅडम यांनी पाहिले. यावेळी शाळेच्या सर्व स्टाफ उपस्थित होता.


२३ डिसेंबर २०२५

सत्तालोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल.*


 *सत्तालोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल.*

' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला आहे.आज कोण नेता कुणासोबत आहे हे कळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली आहे. निवडून आल्यावर आत्ताचे नगरसेवक कोट्यधीश बनले आहेत. विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहचवण्यासाठी शाळा, दवाखाने, वाहतूक,रोजगार याचे सक्षमीकरण करणे हे आप चे धोरण असेल. पंजाब, दिल्ली येथे जे बदल करून दाखवले तेच आप ची विकासाचे मॉडेल आहे.' पुण्यात पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे प्रभारी आणि दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल बोलत होते.

आम आदमी पार्टी ही निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न असेल. प्रामाणिक इमानदार कार्यकर्ते आमच्याकडे असल्याने आम्ही अनेक नगरपालीकांमध्ये उमेदवार यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. आम आदमी पार्टी ने स्टार प्रचारक यादी जाहीर केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान, राखी बिडलान प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत अशी माहिती प्रकाश जरवाल यांनी दिली.

नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे आप उमेदवार शालिनीताई सुखधान निवडून आल्या असून महाराष्ट्रात खाते उघडले आहे असे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी सांगितले.

या वेळी आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत तसेच शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे व पदाधिकारी उपस्थित होते.

२२ डिसेंबर २०२५

जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या सौ.सविता शंकर तोडकर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी कोळा गटातून रणशिंग फुंकले आहे.



 कोळा पंचायत समिती गणातून एक जिद्दी आणि खंबीर नेतृत्व समोर येत आहे. जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या सौ.सविता शंकर तोडकर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी कोळा गटातून रणशिंग फुंकले असून मैदान मारणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. केवळ सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आणि जनतेसाठी हीच ओळख असलेल्या सविता तोडकर यांनी आजवर निष्ठेची ढाल आणि कष्टाची तलवार घेऊन समाजकारणाचे मैदान गाजवले आहे.कोळा गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. कोळा परिसरात सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे सौ सविता शंकर तोडकर होय. पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास विजयाचा गुलाल उधळण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. सांगोला तालुक्याचे माजी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि कोळा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे रोखठोक मत सौ.सविता शंकर तोडकर कोळा पंचायत समिती गण इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गट यांनी शिवकाळ न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले. राजकारणात हार जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे सौ.सविता तोडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे यापूर्वीही त्यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या कोळा ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणांगणात अत्यंत अटीतटीची झुंज दिली आहे. परंतु विजयाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांनी जनसेवेचा झंजावात कधीही थांबवला नाही. पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने सामान्यांच्या प्रश्नांसाठी सविता तोडकर अहोरात्र झटत राहिल्या. सांगोल्याचे माजी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या विचारधारेतून त्यांनी कोळा परिसरात विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्यानासाठी राखीव भूखंडावर बेकायदेशीर बांधकामाचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयात जनहित याचिकेचा इशारा


 उद्यानासाठी राखीव भूखंडावर बेकायदेशीर बांधकामाचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयात जनहित याचिकेचा इशारा

सांगोला नगरपरिषद हद्दीतील उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर बेकायदेशीररित्या बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. राजाराम वामन बनसोडे यांनी पुणे विभागीय आयुक्त व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे.

सांगोला शहरातील सर्वे क्र. २४७ (पैकी) येथील आरक्षण क्र. ३६ अंतर्गत २२०० चौ. मी. (२२ गुंठे) क्षेत्र सार्वजनिक बगीच्यासाठी राखीव असून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ नुसार ही जागा आजही उद्यानासाठीच राखीव आहे. मात्र, या जागेतील सुमारे १० गुंठे क्षेत्रावर पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या रहिवासी बांधकामास परवानगी देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

अ‍ॅड. बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ जमीन मालकांनी २०१३ मध्ये नगरपरिषदेस ५० टक्के क्षेत्र विनामोबदला देण्याचा नोंदणीकृत करार केला होता. त्यानंतर ३० मे २०१५ रोजी राज्य शासनाने मंजूर केलेल्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेतही सदर भूखंड उद्यानासाठीच आरक्षित ठेवण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित अधिकारी व काही खासगी व्यक्तींच्या संगनमतातून या आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी ८ सप्टेंबर २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट दाद मागण्यात आली आहे. तातडीने बेकायदेशीर अतिक्रमण हटवून उद्यानासाठी राखीव भूखंड मोकळा करावा, तसेच दोषी अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

सात दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. सार्वजनिक हिताच्या या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

१५ डिसेंबर २०२५

कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त प्रथम सरपंच नितीन कांबळे यांचा सांगली येथे उमा फिल्म प्रोडक्शन च्या वतीने राज्यस्तरीय मानपत्र देऊन सन्मान

 


साहित्य, समाज आणि सिनेमाचा दीपस्तंभ: सरपंच नितीन कांबळे यांचा 'सांगली'त सन्मान!*

संस्कृतीच्या भूमीवर, कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर वसलेल्या सांगली नगरीत, ज्ञान, कला आणि समाजसेवा या त्रिवेणी संगमाचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा करण्यात आला. 'साहित्य कलाकार महामेळावा' या दिमाखदार सोहळ्यात, घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच, श्री. नितीन कांबळे यांना त्यांच्या अतुलनीय आणि बहुमोल कार्यासाठी 'उमा फिल्म प्रोडक्शन'च्या वतीने राज्यस्तरीय मानपत्राने गौरविण्यात आले.

सरपंच पद म्हणजे केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नव्हे, तर ती एक जनसेवेची अविरत साधना आहे. श्री. कांबळे यांनी आपल्या कार्यकाळात या पदाला एक अलौकिक उंची प्रदान केली आहे. ग्रामविकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी घोरपडी गावाला एक आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या लोककल्याणकारी दृष्टीची महती आज पंचक्रोशीत दुमदुमत आहे.

परंतु, त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ समाजकारणापुरते मर्यादित नाही. ते आहेत साहित्य आणि कला क्षेत्राचे एक तेजस्वी नक्षत्र. त्यांच्या लेखणीतून उतरलेले शब्द हे मानवी जीवनातील वास्तव आणि भावनांचे सप्तरंग सहजपणे टिपतात. त्यांची साहित्य निर्मिती, मनाला भावणारी, विचारप्रवृत्त करणारी आणि समाजमनाला नवी दिशा देणारी आहे.

त्याहूनही पुढे जात, त्यांनी चित्रपट निर्मितीच्या माध्यमाद्वारे आपल्या सामाजिक जाणिवांना दृश्यात्मक रूप दिले आहे. सिनेमाच्या पडद्यावर त्यांनी साकारलेले विषय हे केवळ मनोरंजन न करता, ते समाज प्रबोधनाचे बीज पेरण्याचे कार्य करतात. एका लोकप्रतिनिधीने कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात इतक्या समर्पित भावनेने आणि उत्कृष्टतेने योगदान देणे, हे खरोखरच दुर्मीळ आणि अनुकरणीय आहे.

याच त्यांच्या त्रिखंडी कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी, उपस्थित मान्यवरांच्या तेजोमय उपस्थितीत, त्यांना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक 'यशस्वी किमयागार' म्हणून संबोधण्यात आले.

या गौरवसोहळ्याला जत पोलीस स्टेशनचे पीएसआय उदय कुलकर्णी साहेब, माजी तहसीलदार सत्ते साहेब, तसेच ज्येष्ठ साहित्यिक अशोक रास्ते सर आणि दिग्दर्शक अभिनव रास्ते सर यांच्यासह इतर मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती. या सर्व आदरणीय व्यक्तींच्या हस्ते, हे प्रतिष्ठेचे मानपत्र श्री. कांबळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

हे राज्यस्तरीय मानपत्र म्हणजे त्यांच्या कार्याच्या सोन्याचे तोरण असून, ते पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा एक अखंड स्रोत ठरेल, यात शंका नाही.

श्री. नितीन कांबळे यांना मिळालेला हा सन्मान, घोरपडी गावाच्या शिरपेचात खोवलेला एक हिरा आहे. त्यांच्या पुढील साहित्य, समाज आणि चित्रपट निर्मितीच्या प्रवासासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

*आरटीई 25 टक्के राखीव शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू करा : आप पालक युनियन*

 




*आरटीई 25 टक्के राखीव शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू करा : आप पालक युनियन*

आरटीई शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे खाजगी शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. मागच्या शैक्षणिक वर्षात त्याची प्रवेश प्रक्रिया मागील वर्षी डिसेंबर १५ ला सुरू झाली होती. परंतु यंदाच्या प्रवेशाबाबत अजून आदेशच निघाला नसल्यामुळे आम आदमी पार्टी पालक युनियन तर्फे राज्य शिक्षण संचालक यांना निवेदन देण्यात आले. डिसेंबर व जानेवारी मध्ये सीबीएसई व इतर बोर्डांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते. या शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागा भरण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली तर पालकांसाठी द्विधा मनस्थिती तयार होते. लॉटरी सिस्टीम मुळे प्रवेशाची खात्री नसते अशा वेळेस आर टी इ ची लॉटरी आधी काढली तर प्रवेश न मिळालेल्या पालकांना इतरत्र प्रवेश देणे सुलभ होते. यासाठी ही प्रक्रिया डिसेंबर मध्ये सुरू होणे गरजेचे असते. यावर्षी अजूनही यावर आदेश न निघाल्यामुळे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी, हनुमंत शिंदे आदींनी शिक्षण संचालक शरद गोसावी, सहसंचालक रमाकांत काठमोरे यांची भेट घेऊन पालकांच्या अडचणी सांगितल्या. पालकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी वेळ लागतो. आधार कार्ड, उत्पन्न दाखला इत्यादी मिळण्यास बऱ्याचदा तांत्रिक अडचणी येतात. यामुळे शाळा नोंदणी लवकर सुरू होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रभरातून साधारण एक लाख प्रवेश होतात तर त्यासाठी तीन लाख पालक अर्ज करतात. पुण्यामध्ये १९००० प्रवेश असतात व त्यास साठ हजार पेक्षा जास्त अर्ज केले जातात. मोठ्या संख्येवर पालक या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत असतात असे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.दोन वर्षांपूर्वी सरकारने ही प्रक्रिया बदलण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले होते. त्यामुळे त्यामध्ये बदल करणे अपेक्षित नाही असेही मुकुंद किर्दत म्हणाले.आप पालक युनियन/ आम आदमी पार्टी