माडगुळ पंचायत समिती गणात परिवर्तनाचा एल्गार दादासाहेब मोटे (सर) यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
माडगुळ पंचायत समिती गणात परिवर्तनाचा एल्गार दादासाहेब मोटे (सर) यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
भारतीय जनता पार्टीचे नेते ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे ,आमदार गोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद (शेठ )पडळकर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे माडगूळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री.दादासाहेब विठोबा मोटे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शब्दात ताकद विचारात जनतेचा विश्वास असलेले आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, प्रगतशील बागायतदार आणि आदर्श शिक्षक म्हणजे दादासाहेब मोटे( सर ) माडगुळे पंचायत समिती गणाच्या विकासासाठी आपले बहुमोल मत कमळ चिन्हाला .कमळ म्हणजे गतिशील विचार आणि विकासात्मक धोरण. माडगुळ पंचायत समिती गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार दादासाहेब मोटे सर म्हणजे प्रामाणिक शांत आणि समाजसेवेचा वसा जोपासणारे प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. चला कमळ फुलवू आटपाडी तालुक्याचा विकास घडवू ही घोषणा प्रत्येक गावात ,वाडी -वस्तीवर,गावागावात घुमत आहे. आटपाडी तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर माडगूळ पंचायत समितीच्या मातीत जनतेच्या आशीर्वादाने परिवर्तनाचा गुलाल उधळला जाणार असा विश्वास मतदारांमधून व्यक्त केला जात आहे. माडगुळ पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माडगुळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री.दादासाहेब मोटे( सर) यांनी शिवकाळ न्यूज चॅनल शी बोलताना व्यक्त केला.माडगूळ पंचायत समिती गणात रस्ते ,पाणी, वीज ,आरोग्य व शिक्षण यासह मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष भर देणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावून आटपाडी तालुक्याच्या विकासात योगदान देण्याचा निर्धार भाजपचे अधिकृत उमेदवार दादासाहेब मोटे यांनी व्यक्त केला.
माडगुळ पंचायत समिती गणातील पिंपरी खुर्द ,आंबेवाडी, खांजोडवाडी ,बोंबेवाडी, यमाजी पाटील वाडी, मासाळवाडी, माडगुळ, लेंगरेवाडी, तडवळे या गावातून भारतीय जनता पक्षाचे माडगूळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री दादासाहेब मोटे सर यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.





0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ