*सांगोला पंचायत समितीत वॉशरुम अभावी महिला वर्गांची कुचंबना* *पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष*
साप्ताहिक शिवकाळ
माडगुळ पंचायत समिती गणात परिवर्तनाचा एल्गार दादासाहेब मोटे (सर) यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
कष्टाची प्रचंड क्षमता, आकाशी झेप घेण्याचे स्वप्न, परिस्थितीशी दोन हात करण्याची इच्छा आणि सेवाभावी वृत्ती यामुळे चर्चेत आलेले आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी गावचे सुपुत्र नवनाथशेठ ऐवळे हे व्यक्तिमत्व म्हणजे 'शून्यातून विश्व' निर्माण करणारे विलक्षण योद्धे आहेत.
घरची गरिबी, परिस्थितीमुळे अर्धवट सोडावे लागलेले शिक्षण, मिळेल ते कष्ट करून स्वतःचा आणि कुटुंबाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन बोंबेवाडी येथील नवनाथ ऐवळे या तरुणाने गाव सोडले. संकटापुढे रडत बसण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करण्याची उर्मी अंगी असलेल्या या तरुणाने संकटांविरोधातच बंड केले. आणि हे बंड यशस्वी करून आज नवनाथ ऐचले हे बोंबेवाडीसह पंचक्रोशीत नवनाथशेठ बनले.
मिळेल ते काम करणे, त्यातून दोन वेळच्या जेवणाची सोय करणे आणि अहोरात्र झगडत स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन नवनाच यांनी खेळण्या-बागडण्याच्या वयात घर आणि गाव सोडले. सुमारे दहा वर्ष इतरांच्या गलाई दुकानात कामगार म्हणून काम केले.
जिद्द, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक कामाला देव मानून नवनाथ यांनी हाल झाले तरी-हार होऊ देणार नाही' ही भुमिका सार्थ ठरविली. भुतकाळात सोसलेल्या यातना मुळापासून नष्ट करण्याचा त्यांनी विडा उचलला. मिळेल तिथे त्यांनी आपल्या चांगुलपणातून लोकांची मने जिंकली.
उरात बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्तीसगड गाठले. बिलासपुर येथे त्यांनी स्वबळावर छोटेखानी गलाईचा व्यवसाय सुरू केला. चांगुलपणा आणि प -ामाणिक सेवेतून नवनाथ ऐवळे यांनी व्यवसायात बसस्थान बसविले. बोंबेवाडी गावातून बाहेर पडून सुमारे २५ वर्षापूर्वी सुरू केलेला प्रवास आज एका यशोशिखरावर पोहोचला आहे.
काळ बदलला तसे नवनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही दिवस बदलले. आज नवनाथ सर्वांचे लाडके नवनाथशेठ बनले आहेत. आपली परिस्थिती बदलली, प्रगती झालीतरी पाय जमिनीवर ठेवून त्यांची वाटचाल भक्कमपणे सुरू आहे. गलाई व्यवसायात एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून नवनाथशेठ यांनी लौकिक प्राप्त केलातरी त्याचा कोठेही मोठेपणा त्यांच्या अंगी नाही. साधेपणा, सर्वांशी हसतमुख आणि विनम्रपणे व्यवहार करणारे नवनाथशेठ आज सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी तत्पर असणारे मदतगार म्हणून प्रसिद्ध आहेत.
बोंबेवाडीतील गरजूंच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांना सढळ हाताने आर्थिक मदत करण्यासाठी नवनाथशेठ अग्रभागी आहेत. लक्ष्मीमातेचा वरदहस्त लाभलेल्या नवनाथशेठ ऐवळे यांनी गावातील लक्ष्मीदेवीच्या प्रत्येक धार्मिक सोहळ्यात मदतीसाठी तत्पर असतात. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ते सदैव पुढे असतात. कुस्तीपटू, तालीम गावातील कुस्ती मैदान यांना ते मदत करतात. गावातील नावाजलेली पहित्ती कुस्ती आजही नवनाचशेठ यांचीच असते. गतवर्षी त्यांनी कुस्ती मैदान यशस्वी केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत, वधुवर मेळाव्याला मदत करणारे नवनाथशेठ सदैव प्रसिद्धीपासून दूर राहिले. 'मी शून्यातून इथेपर्यंत पोहोचलो आहे. जे काही मला मिळाले आहे, त्याचा लाम इतरांनाही झाला पाहिजे, अशी प्रांजळ भावना असलेले नवनाथशेठ आपल्या दातृत्वासाठी लोकांच्या हृदयात घर करून आहेत.
समाजासाठी काम करताना लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करणारे नवनायशेठ ऐवळे म्हणजे मैत्रीच्या दुनियातील राजा माणुस आहेत. महाराष्ट्राचे लाडके नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी घनिष्ठ नाते असलेले नवनाथशेठ समाजकारणातुन ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. बोंबेवाडीचे हे सुपुत्र छत्तीसगड गलाई असोसिएशनचे महासचिव म्हणून ठसा उमटवत आहेत. समाजातील उपेक्षीत, वंचित घटकांप्रती आस्था असणारे, प्रचंड स्वाभिमानाने सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणारे सर्वांचे लाकडे व्यक्तीमत्त्व आणि आमचे जिवलग मित्र नवनाबशेठ ऐवळे यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.
मा.जनार्दन मोटे (सर) बोंबेवाडी.
आज बैलगाडा शर्यत
छत्तीसगड गलाई असोसिएशनचे महासचिव, प्रसिध्द गलाई व्यवसायिक, बोंबेवाडी गावचे सुपुत्र मा. नवनाथशेठ ऐवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक ७जानेवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बोंबेवाड़ी-आंबेवाडी फाटीवर सकाळी सात वाजल्यापासुन बैलगाडा शर्यत होणार आहे. लाखोंच्या बक्षिसांची शर्यत एक पर्वणी असुन त्याचा लाभ बैलगाडा चालक-मालक, शेतकरी, शर्यतप्रेमी आणि आटपाडी तालुक्यातील लोकांनी घ्यावे.
सिंधूताई शेलार यांची महिला संघर्ष समिती पुणे जिल्हा सचिव पदावर नियुक्ती.
आंदोलन म्हणले की सिंधूताई आणि सिंधूताई म्हणाले की आंदोलन अशी ओळख असणारी पुणे शहरातील एक धडाडीची सामाजिक कार्यकर्ती.राजकीय वारसा नसणारी सर्वसामान्य कुटुंबातील पण अन्यायाविरुद्ध चीड असणारी आक्रमक स्वभावाची महिला नेतृत्व म्हणजेच सिंधूताई शेलार .पुणे शहरातील अनेक गरजूंच्या मदतीला धावून जात अगदी निस्वार्थीपणे सामाजिक कार्याचा जागर करीत निघालेल्या रणरागिणी म्हणजेच सिंधूताई शेलार मास मुव्हमेंट संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडत आहेत.त्याबरोबरच महिला संघर्ष समिती मध्ये नुकतेच त्यांची पुणे जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती संस्थापक अध्यक्षा रिनाताई जाधव यांनी केली आहे.अन्यायाविरुद्ध जोरदार लढा देऊन गरजूंना,महिलाना मोठा आधार देण्याचे कार्य सिंधूताई शेलार करीत असतात.अनेक मोडणारे संसार त्यांनी जोडले आहेत.तुटत चाललेल्या मनांची योग्य समुपदेशन करून समजूत घालून त्यांना योग्य दिशा दाखवली आहे.त्यामुळे महिलांमध्ये त्या सिंधूताई या नावानेच प्रसिद्ध आहेत.महिला संघर्ष समिती च्या संस्थापक अध्यक्षा रिनाताई जाधव यांनी नुकतीच त्यांची महिला संघर्ष समिती पुणे जिल्हा सचिव पदावर नियुक्ती करून खऱ्या अर्थानी लढणाऱ्या रणरागिणीचा योग्य सन्मान केला आहे.या नियुक्तीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांचे हितचिंतक,नातेवाईक, मित्र-मैत्रिणी कडून अभिनंदन केले जात आहे...
*नागज फाट्यावरील 'संवाददूत' ते यशस्वी उद्योजक*
रमेशरावांचा प्रवास हा केवळ व्यावसायिक प्रगतीचा आलेख नसून तो एका जिद्दीचा महाग्रंथ आहे. मिरज-पंढरपूर मार्गावरील नागज फाटा ही त्यांच्या कर्तृत्वाची पहिली प्रयोगशाळा ठरली. ज्या काळात जग 'कनेक्ट' होण्यासाठी धडपडत होते, तेव्हा त्यांनी सुरू केलेले 'एसटीडी बूथ' हे केवळ दुकान नव्हते, तर ते हजारो विलग झालेली मने जोडणारा माणुसकीचा पूल होता.
*ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाचे 'भागीरथ'*
दूरदृष्टी लाभलेल्या रमेश पाटील यांनी काळाची पावले ओळखून ग्रामीण भागात 'डिजिटल क्रांती'चे बीज रोवले. शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या कामाला गती देण्यासाठी त्यांनी आणलेली 'फॅक्स' सुविधा त्याकाळी परिसरासाठी वरदान ठरली. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा वेळ आणि कष्ट वाचवणारे रमेशराव खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी 'डिजिटल युगाचे देवदूत' ठरले. तंत्रज्ञानाचा हा स्पर्श केरेवाडी आणि नागज परिसराच्या विकासासाठी एक नवी पहाट घेऊन आला.
*कर्तृत्वाचे 'ऐश्वर्य' आणि सेवाव्रती वृत्ती*
'ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन'च्या माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असली, तरी त्यांचे पाय सदैव केरेवाडीच्या मातीशी घट्ट जोडलेले आहेत. १९९५ मध्ये विकास सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा राजकीय व सामाजिक प्रवास आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे.
*वारीचा वसा:* पंढरीच्या पांडुरंगाप्रती असलेली भक्ती ते वारकऱ्यांच्या सेवेतून व्यक्त करतात. वारीच्या वाटेवर तहानलेल्यांना पाणी आणि भुकेलेल्यांना तृप्त करण्यात त्यांना ईश्वरी आनंद मिळतो.
*संवेदनशील समाजसेवक:* केवळ नफा न पाहता समाजाचे ऋण फेडण्याची वृत्ती हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे.
शुभेच्छांचा मळा फुलला!
एका यशस्वी उद्योजकाची शिस्त आणि एका समाजसेवकाचे हळवे मन जपणारे रमेश नामदेव पाटील हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केरेवाडीसह संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*"कष्टाच्या घामाने शिंपली त्यांनी माती,*
*माणुसकीच्या नात्याने जोडली शेकडो नाती,*
*यशाच्या शिखरावरही नम्रता ज्यांच्या ठायी,*
*अशा 'रमेशरावांच्या' कीर्तीचा सुगंध दाहीदिशी राही!"*
या जनसेवकाला उदंड आणि सुदृढ आयुष्य लाभो, हीच ई
श्वरचरणी प्रार्थना!
आज आपल्या चंद्रभागा फाउंडेशन याशैक्षणिक संकुलामध्ये क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले नागठाणे गावचे विद्यमान युवा सरपंच माननीय श्री सागर पाटील सर व सौ मनीषा येडेकर मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पिके पाटील सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साळुंखे मॅडम यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. अतिशय सुंदर आणि आनंददायी वातावरणामध्ये या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले.
त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख पाटील मॅडम यांनी केले. व क्रीडा विभागाचे सर्व कामकाज क्रीडा विभाग प्रमुख नदाफ मॅडम यांनी पाहिले. यावेळी शाळेच्या सर्व स्टाफ उपस्थित होता.
' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला आहे.आज कोण नेता कुणासोबत आहे हे कळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली आहे. निवडून आल्यावर आत्ताचे नगरसेवक कोट्यधीश बनले आहेत. विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहचवण्यासाठी शाळा, दवाखाने, वाहतूक,रोजगार याचे सक्षमीकरण करणे हे आप चे धोरण असेल. पंजाब, दिल्ली येथे जे बदल करून दाखवले तेच आप ची विकासाचे मॉडेल आहे.' पुण्यात पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे प्रभारी आणि दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल बोलत होते.
आम आदमी पार्टी ही निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न असेल. प्रामाणिक इमानदार कार्यकर्ते आमच्याकडे असल्याने आम्ही अनेक नगरपालीकांमध्ये उमेदवार यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. आम आदमी पार्टी ने स्टार प्रचारक यादी जाहीर केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान, राखी बिडलान प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत अशी माहिती प्रकाश जरवाल यांनी दिली.
नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे आप उमेदवार शालिनीताई सुखधान निवडून आल्या असून महाराष्ट्रात खाते उघडले आहे असे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी सांगितले.
या वेळी आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत तसेच शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे व पदाधिकारी उपस्थित होते.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर बेकायदेशीररित्या बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अॅड. राजाराम वामन बनसोडे यांनी पुणे विभागीय आयुक्त व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे.
सांगोला शहरातील सर्वे क्र. २४७ (पैकी) येथील आरक्षण क्र. ३६ अंतर्गत २२०० चौ. मी. (२२ गुंठे) क्षेत्र सार्वजनिक बगीच्यासाठी राखीव असून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ नुसार ही जागा आजही उद्यानासाठीच राखीव आहे. मात्र, या जागेतील सुमारे १० गुंठे क्षेत्रावर पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या रहिवासी बांधकामास परवानगी देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अॅड. बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ जमीन मालकांनी २०१३ मध्ये नगरपरिषदेस ५० टक्के क्षेत्र विनामोबदला देण्याचा नोंदणीकृत करार केला होता. त्यानंतर ३० मे २०१५ रोजी राज्य शासनाने मंजूर केलेल्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेतही सदर भूखंड उद्यानासाठीच आरक्षित ठेवण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित अधिकारी व काही खासगी व्यक्तींच्या संगनमतातून या आरक्षित जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ८ सप्टेंबर २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट दाद मागण्यात आली आहे. तातडीने बेकायदेशीर अतिक्रमण हटवून उद्यानासाठी राखीव भूखंड मोकळा करावा, तसेच दोषी अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
सात दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. सार्वजनिक हिताच्या या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.