२७ नोव्हेंबर २०२५

हातीद येथे रविवारी श्री दत्तगुरु यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहन शुभारंभ

 रविवारी हातीद येथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील

सोलापूर जिल्ह्यातील हातीद गावात हभप दत्तात्रय आण्णा भंडगे व भंडगे परिवाराच्या वतीने बनविण्यात आलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये श्रीगुरुदेव दत्त यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण येत्या रविवारी होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन भंडगे परिवाराकडून केले आहे. दत्त मंदिराबाहेर श्री हनुमान व श्री गणेशाच्या मूर्ती बसविण्यात येत आहेत. हातीद (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील वारकरी सांप्रदायचे सदस्य व पंढरपूर येथील संत नामदेव महाराज फडावरील फडकरी असणाऱ्या भंडगे कुटुंबाकडून गेल्या अनेक वर्षांपासून श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा संपूर्ण खर्च या परिवारातील सदस्यांकडून केला जातो.या परिवाराने गेली ४१ वर्षे आपल्या - घरासमोरील उंबर वृक्षाखाली श्री दत्त - यांचा फोटो ठेवून जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही अतिशय श्रद्धेने ते हा सप्ताह साजरा करत होते. विशेष म्हणजे भंडगे कुटुंबातील सर्वजण माळकरी असून भजना मध्ये गायन, तबला वादन, पखवाज वादनकरीत असतात. सध्या याच ठिकाणी भंडगे कुटुंबाने सुमारे पंधरा लाख रुपये खर्चुन भव्य असे श्री दत्त मंदिर उभारले आहे. त्यामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी पावणेदोन लाख रुपये किंमतीची पंढरपूर येथून मूर्ती आणली आहे. शुक्रवारी दि. २८ रोजीदुपारी दोननंतर गावातून या मूर्तीची धार्मिक पद्धतीने सवाद्य मिरवणूक नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. रविवार दि. ३० रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी नूतन दत्त मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण हभप माधव महाराज व मुकुंद महाराज नामदास यांच्या उपस्थितीत व कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील मठाधिपती आनंदगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हभप विष्णू महाराज केंद्रे, विष्णू महाराज जाधव, भास्कर महाराज पवार उपस्थित राहणार आहेत.

२८ नोव्हेंबर ते। या वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त दि ते ५ डिसेंबर अखेर भंडगे परिवाराकडून श्री गुरुचरित्र व श्री ज्ञानेश्वरी या धार्मिक ग्रंथाचे पारायण, अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. यासाठी व्यासपीठ चालक म्हणून हभप अनिकेत डुबुले महाराज तर हभप बिरा महाराज बंडगर (घेरडी), केशव महाराज हेगडे (सोनलवाडी), संतोष महाराज तळसकर (कोल्हापूर), शिवाजी महाराज साळुंखेवाळेखिंडी), नामदेव महाराजांचे १७ वे वंशज एकनाथ महाराज नामदास (पंढरपूर), रामहरी महाराज खंडागळे (कोळे) तसेच श्री गुरु माऊली मुरारी महाराज नामदास यांची काल्याचे कीर्तन सेवा होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन भंडगे परिवारातर्फे करण्यात आले आहे.
वैकुंठवासी 
तुकाराम महाराज नामदास यांच्या कृपाशीर्वादाने व माधव व मुकुंद महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी राजाराम भंडगे, वैकुंठवासी पांडुरंग हेगडे यांच्या आशीर्वादाने अध्यात्मिक वाटचाल करणाऱ्या मंगल व दत्तात्रय भंडगे या दाम्पत्याने भाऊ सुभाष, शिवाजी, शंकर आणि संभाजी भंडगे यांच्यासह एकत्रितपणे या मंदिराची निर्मिती केली आहे. त्यांना हातीदकर ग्रामस्थांनी मदत केली आहे

कुंदन बनसोडे यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद


 प्रभाग ३ मध्ये प्रचारात बहुजन समाज पार्टीची मुसंडी उमेदवार कुंदन  बनसोडे यांच्या हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन प्रभाग क्रमांक ३ ब मधून प्रचारामध्ये बहुजन समाज पार्टीने चांगलीच मुसंडी मारली आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, रस्ते, गटारी, पथदिवे, शौचालय आदि सोयी सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या पोहचून पारदर्शक कारभार करण्यावर अधिक भर देत, उमेदवार कुंदन बनसोडे यांच्या हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून केले जात आहे.

सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टी मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. इतर राजकीय पक्षांना सामोरे जाण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार देखील मोठ्या शर्यतीने कामाला लागले आहेत. बहुजन समाज पार्टीचे उमेदवारांना मतदारांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक तीन ब मधून कुंदन बनसोडे या उमेदवारांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचेही सांगितले जात आहे.राजकारणाच्या पटलावर विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चालत असलेल्या प्रचार यंत्रणेमध्ये बहुजन समाज पार्टीने देखील सक्रिय सहभाग नोंदवत जे आजपर्यंत इतरांना जमले नाही ते आम्ही करून दाखवू, प्रभागातील लोकांना नगरपालिकेच्या सर्व सोयी सुविधा पुरवण्यामध्ये कधीही कमी पडणार नाही. आलेला प्रत्येक निधी पारदर्शकपणे राबवत प्रभागात विकासाचा मॉडेल उभा करू, यासह नगरपालिका कर्मचाऱ्यांना देखील जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. यामध्ये प्रभागातील नागरिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकांना सोबत घेऊन आम्ही विकासाचे धोरण राबवू असा विश्वास उमेदवार कुंदन बनसोडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला आहे.

२४ नोव्हेंबर २०२५

हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांची प्रतिक्रिया


हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आप प्रशांत कांबळे यांची तीव्र प्रतिक्रिया 

नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उद्देशून स्पष्ट इशारा दिला की, “मतदान आमच्या बाजूने नाही केले तर तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत”. त्याचबरोबर भाजपचेआमदार चंद्रकांत पाटील यांनीही “तिजोरीचा मालक आम्हीच आहोत आणि चाव्या तुमच्याकडे वॉचमन म्हणून दिल्या आहेत” असे वक्तव्य केले. या दोन्ही विधानांनी लोकशाहीचा आत्मा दुखावला असून, नागरिकांना नोकर समजून सत्ता चालवण्याची मानसिकता स्पष्ट करते.सत्ताधाऱ्यांचा तिजोरीवर मालकी हक्काचा दावा लोकशाही की लूटशाही?तिजोरीच्या मालकीचा खरा हक्क हा जनतेचा आहे. जनता ही तिजोरीची मालक असून निवडून आलेले प्रतिनिधी हे फक्त तिचे 5 वर्षा साठी नोकरदार आहेत. परंतु आज हेच नोकर मालक बनण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेच्या अहंकारातून हुकूमशाहीकडे वाटचाल होताना शासनकर्ते सर्वसामान्यांनाच धमकावताना दिसतात.संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाही मूल्यांची पायमल्लीउद्या संविधान दिन आहे. या संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वतंत्रपणे मतदानाचा अधिकार दिला आहे, जो कोणत्याही दबाव, धमकी किंवा स्वार्थासाठी वापरला जाऊ नये. पण आज आपण बघतो, की मताच्या जोरावर सत्तेत बसल्यानंतर, हजारो कोटींच्या निधीचा गैरवापर करून, स्वतःची तिजोरी भरण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत. हा सरळसरळ लोकशाहीवरील प्रहार आहे.
जनतेला नोकर मानण्याची मानसिकता धोकादायकजनतेकडे चावी देणं म्हणजे सत्ता जनतेची आहे, हे संविधान सांगते. पण चावी देऊनही स्वतःला मालक म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांची ही विचारसरणी ही लोकशाहीच्या विरोधात आणि हुकूमशाहीच्या बाजूने आहे. जनता ही तिजोरीची खरी मालक आहे आणि सत्ताधारी केवळ नोकरदार, हे त्यांना पुन्हा आठवण करून द्यावी लागेल.आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष व सामाजिक न्याय विभाग प्रमुख प्रशांत कांबळे यांनी या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला असून म्हटले आहे.सत्ताधाऱ्यांनी मतदारांचा अपमान थांबवावा. संविधानाने दिलेला मताधिकार हा कोणत्याही धमकीपेक्षा मोठा आहे. नोकरदार लोकप्रतिनिधी तिजोरी लुटण्याचे संकेत देत आहेत. लोकशाही वाचवायची आहे की तिजोरीआजचा असली प्रश्न हाच आहे. ही तिजोरी जनतेची ठेवायची की सत्ताधाऱ्याची हे जनतेने आता ठरवलं पाहिजे.

२२ नोव्हेंबर २०२५

डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकर मंगेवाडी येथे संविधान सन्मान रॅली संपन्न.


डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकर मंगेवाडी येथे संविधान सन्मान रॅली संपन्न.संस्थेच्या वतीने दिनांक 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर संविधान सन्मान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ग्रामस्थ आणि संस्थेच्यावतीने संविधान जनजागृती व सन्मान रॅली काढण्यात आली.या रॅलीदरम्यान भारतीय संविधान हक्क व अधिकार, कर्तव्य,शिक्षण, स्त्री पुरुष समानता,मतदान,स्वातंत्र्य, समता,बंधुता याविषयी घोषणा देण्यात आल्या.सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा पटागणात गोल रिंगण करून संविधान संवादक सुषमा होवाळ यांनी संविधान हक्क व अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं.तसेच संविधान संवादक शारदा गडदे यांनी भारतीय संविधानाचा अभंग सादर केला.यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर भारतीय राज्यघटनेची उद्देशिका वाचन करण्यात आले.यावेळी डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला यांच्यावतीने सर्व शिक्षक,कर्मचारी,ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे आभार मानले.भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.संविधान सन्मान रॅली उत्साहात संपन्न झाली..या संविधान सन्मान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक जगताप सर,सह शिक्षक विश्वंभर लवटे सर,सचिन तंडे सर,भारत जावीर सर, साउबा वाले सर,यांचे सहकार्य मिळाले.

१९ नोव्हेंबर २०२५

पुणे येथील युवा सामाजिक कार्यकर्त्या सारिका साळवे यांची नुकतीच नॅशनल अँटीकरप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली

 


पुणे येथील युवा सामाजिक कार्यकर्त्या सारिका साळवे यांची नुकतीच नॅशनल अँटीकरप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. महिला संरक्षण विभागातून त्यांना सदर नियुक्तीचे नियुक्तीपत्र आणि अधिकृत ओळखपत्र देण्यात आले. यासोबतच सारिका साळवे या मधुसूदन उपभोक्ता एवं राष्ट्रीय मानव अधिकार हक्क या संघटनेच्या राष्ट्रीय मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करीत आहेत. समाजातील दुर्बल घटक, दिव्यांग, अनाथ ,महिला व अत्याचार ग्रस्त व्यक्तींना मदत करणे त्यांना आधार देणे या माध्यमातून सारिका साळवे या सामाजिक कार्य करतात. 
याकामी समाजातील एनजीओ संस्था, वृत्तपत्रे, पोलीस अधिकारी ,सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर नातेवाईक मित्र मैत्रिणी व कुटुंबाचे मोठे सहकार्य मिळते.वाढती बेरोजगारी आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याच्या समस्या वाढता भ्रष्टाचार दारिद्र्य आणि असमानता तसेच युवकांमधील व्यसनाधीनता या समाजाला भेडसावणाऱ्या समस्यां सोडवण्यासाठी सारिका साळवे या भर देऊन काम करतात.
तसेच सध्या महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे सारिका साळवे या समाजात जनजागृती करणे ,पीडित महिलेला आधार देणे तक्रार नोंदविण्यास मदत करणे या प्रकारे महिला सुरक्षेसाठी उपक्रम राबवित असता


आई सौ.शकुंतला दिगंबर साळवे यांनी खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळे सामाजिक कार्य करण्यासाठी अधिक बळ आणि प्रेरणा मिळते.वडील दिगंबर साळवे हे मुख्याध्यापक असल्यामुळे कडक शिस्तीचे पण तेवढेच प्रेमळ आहेत.तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना मास मुव्हमेंट संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा सौ.सिंधूताई शेलार, तसेच शिक्षणाचा गंध नसलेली मावशी सौ.सविता गायकवाड यांनी सारिका साळवे सारख्या सामाजिक कार्यकर्तीला घडवले.प्राध्यापिका सुंदर साळवे,यांचे बहुमोल सहकार्य लाभते..

१३ नोव्हेंबर २०२५

वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष भूषण चंदनशिवे तर जिल्हा संघटक पदी रूपेश माने यांची नियुक्ती

.. 
. ..वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यालय तून वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या कार्यकारणीत सामावून घेण्यात आले. यामध्ये कवठेमंकाळ तालुक्यातील युवा कार्यकर्ते रुपेश बाबुराव माने यांची वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. तर कवठेमंकाळ शहरातील भूषण चंदनशिवे यांची वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रुपेश माने हे फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीत धडाकेबाज काम करणारे कार्यकर्ते आहेत. अतिशय शांत संयमी स्वभाव असणारे माने हे सर्वसामान्य वंचित ,वृद्ध ,महिला व विद्यार्थी यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. सर्वसामान्य घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे झटण्याचं काम करत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील रुपेश माने व कवठेमंकाळ शहरातील भूषण चंदनशिवे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारणीत नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. रुपेश माने हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये धडाकेबाजपणे काम करत आहेत.






१२ नोव्हेंबर २०२५

भाजपाचे रवि गायकवाड वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश


 बिग ब्रेकिंग न्यूज 

       सोलापूर शहरातील  भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक, माननीय रवि (बॉस) गायकवाड यांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.सोलापूर शहरातील अत्यंत नामवंत असे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक श्री रवि गायकवाड यांचा आज वंचित बहुजन आघाडी या पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळीवंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे सर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यशपाल सोनकांबळे यशवंत इंगळे चंद्रकांत शिंगे बनसोडे राजकुमार वाघमारे आणि अशोक कल्लाप्पा शिंगे आधी सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी शिवाजी कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुका मंगळवेढा प्रसिद्धी प्रमुख 

०९ नोव्हेंबर २०२५

हातिद पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक अपक्ष लढणार.....समाधान (भाऊ)करडे

हातिद पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक अपक्ष लढणार...समाधान (भाऊ)करडे जुजारपूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते समाधान नामदेव करडे हे सामाजिक क्षेत्रातील एक धडाकेबाज काम करणारे व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या जनसंपर्काचे जाळे सर्वच समाज घटकात पसरले आहे.निवडणूक आयोगाने आगामी होवू घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमधील पंचायत समिती हातिद च्या सदस्यपदाची निवडणूक समाधान नामदेव करडे यांनी लढवावी अशी मित्रपरिवार,हितचिंतक व नागरिकांकडून जोरदार मागणी होताना दिसत आहे.समाधान नामदेव करडे हे एक हातीद गटातील लोकप्रिय युवा व्यक्तिमत्व आहे


स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.त्यातच भारतीय जनता पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहेत त्यामुळे कमळ फुलणार का शेतकरी कामगार पक्ष आपली ताकद टिकवून ठेवणार हे येणाऱ्या काळात कळेलच...पण इच्छुक उमेदवारांनी मात्र मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.पक्षश्रेष्ठी कडे उमेदवारीसाठी पाठपुरावा करताना दिसून येत आहेत.तर काहीजण पक्ष उमेदवारी देत नसेल तर अपक्ष लढण्याची देखील तयारी करताना दिसतात.हातीद पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या हातीद पंचायत समिती गणातून जुजारपूर येथील युवा नेते समाधान नामदेव करडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे...

पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीद पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार तुकाराम पाटील


 पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीद पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार तुकाराम पाटील सांगोला तालुका शेकाप पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीद पंचायत समिती गणा मधून आपण चालू वेळची पंचायत समिती निवडणूक लढवणार असे मत जुजारपूर गावचे युवा नेते तुकाराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय पदांचे आरक्षण प्रशासनाकडून नुकतेच जाहीर झालेले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक मंडळी जोमाने कामाला लागले आहेत. जुजारपूर मधील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तुकाराम पाटील हातीद पंचायत समिती गणा मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तालुका शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास आपण ही निवडणूक जोमाने लढवणार असे मत त्यांनी व्यक्त केले.उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना तुकाराम पाटील यांनी सांगितले तुकाराम पाटील जुजारपूर,हातीद,गुणापवाडी,जुनोनीभागातील प्रसिद्ध युवा नेते आहेत.यापूर्वीही त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुजारपूर चे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदावर काम केले आहे. तुकाराम पाटील हे स्वच्छ प्रतिमा, शांत आणि संयमी स्वभावाचे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून युवकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पाटील कुटुंबाने शेकाप ची पताका खांद्यावर घेऊन स्वर्गीय आबासाहेबांबरोबर निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे समाजसेवेचा वारसा तसेच हातीद गणातील जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर असल्याने पक्षाने संधी दिल्यास आपण निश्चितपणे ही निवडणूक लढवून विजयश्री नक्की खेचून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 



हातिद पंचायत समिती गण हा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे.राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे...सांगोला तालुक्यातील हातीद पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे.या गणामध्ये इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पहायला मिळत आहे..या रणधुमाळीत अग्रेसर नाव म्हणजेच जुजारपूरचे युवक नेते तुकाराम पाटील होय .हातिद पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून मतदारसंघातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे...प्रामुख्याने युवक उमेदवारांमध्ये ही लढत होईल अशी चिन्हे दिसत आहेत..शेतकरी कामगार पक्ष आपली ताकद टिकवून ठेवणार का ?भाजपचे कमळ फुलणार.. हे येणाऱ्या काळात कळेलच...नक्की गुलाल कोणाचा हे सर्वस्वी मतदारराजा ठरवणार आहे..समजातील सर्वच घटकात तुकाराम पाटील यांचा जनसंपर्क आहे.त्यांनी हातिद पंचायत समिती सदस्यपद निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार केला आहे.

अखिल गुरव समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश गुरव

अखिल गुरव समाज संघटना सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश गुरव.                           पाचेगाव खुर्द तालुका सांगोला येथील महेश मुरलीधर गुरव यांची नुकतीच अखिल गुरव समाज संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवा आघाडीच्या उपाध्यक पदावर नियुक्ती करण्यात आली..राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले युवा नेतृत्व महेश गुरव हे भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे सांगोला तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत.भाजपाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे सांगोला तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्या साथीने महेश गुरव आपले सामाजिक व राजकीय कार्य दमदारपणे करीत आहेत.धडाडीने काम करणारे युवा नेतृत्व म्हणजेच शांत, संयमी युवा नेतृत्व महेश गुरव होय...अतिशय तळमळीने गुरव समाजातील सर्वच कार्यक्रमात भाग घेऊन सतत सक्रिय काम करतात.एका समाजसेवक कार्यकर्त्याला अखिल गुरव समाज संघटनेने न्याय दिला असल्याची भावना सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.महेश गुरव यांच्या अखिल गुरव समाज संघटना सोलापूरच्या जिल्हा उपाध्यक पदी नियुक्तीमुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे.केवळ राजकारणच नाही तर समाज कारणाचं मिशन उचलल आहे सर्वसामान्य नागरिक,महिला,ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रश्नावर प्रामुख्याने महेश गुरव काम करताना दिसतात.थेट संवाद साधणे ही त्यांची कार्यशैली आहे.सर्व सामान्य जनतेला विविध प्रकारचे दाखले काढून देणे तसेच प्रशासकीय कामामध्ये मदत करणे ह्या कामात महेश गुरव सगळ्यात पुढे असतात.यासोबतच पारंपरिक  धार्मिक विधी करण्याची कार्ये देखील महेश गुरव करतात.