साप्ताहिक शिवकाळ.
संस्थापक संपादक सुभाष गाडे
नोंदणी क्रमांक महा/मराठी३७९१६
पुणे(शिवकाळ न्युज) निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या राष्ट्रीय भारतीय अखंड पार्टी या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून चंद्रकांत क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या पक्ष्याचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी साहू आशिष आझाद यांनी नुकतेच क्षीरसागर यांना निवडीचे पत्र दिले आहे.शेतकरी व सामाजिक चळवळीत केलेल्या कामाची दखल घेवून पक्षाने दिलेली जबाबदारी लोकहितासाठी उपयोगात आणून संघटना वाढीसाठी तन,मन,धनाने काम करणार असल्याचे राष्ट्रीय भारतीय अखंड पार्टीचे नूतन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.