०८ ऑक्टोबर २०२०

सामाजिक कार्यकर्ता जयेश अहिरे

 खानदेशातील एक युवक नोकरीच्या हेतूने पुण्यात दाखल झाला.कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट संघटना च्या बळावर सहजपणे पूनेकरात मिसळतो.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेला सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेला एक हरहुन्नरी युवक जयेश अहिरे. उत र महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेले धुळे हे त्यांचे मुख्य गाव.येथेच १०पर्यंतचे शिक्षण झाले.तर १२चे शिक्षण चंद्रकांत दांगट - पाटील महाविद्यालय वडगाव बुद्रुक येथून पूर्ण केले. राष्ट्रीय छात्र सेनेत सक्रिय सहभागी असल्यामुळे २००९चे महाराष्ट्राचे राज्यपाल एस. सी.जमीर यांना सलामी शस्त्र अर्पण करण्याचा मान जयेश अहिरे यांना महाविद्यालयातर्फे मिळाला. थलसेना कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेतल्याने पिस्तुल चालवण्याचे ज्ञान आहे.                  समाजसेवेचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता जयेश अहिरे यांना धुळे जिल्हा समाज रत्न पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू म्हणजे ते एक सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.हडपसर येथील एस.पी.इंनफोसिटी या कंपनीने त्यांना सर्प मित्र म्हणून गौरव केला आहे.रुद्र ढोल ताष्या पथकाच्या माध्यमातूनही सामाजिक कार्य करीत आहेत.बळीराजा पार्टी उतर महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख यापदावर कार्यात आहेत.तसेच पत्रकारिते च्या माध्यमातूनही काम करीत आहेत.केंद्रीय पत्रकार संघटनेचे पुणे जिल्हा संघटक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.बहुजन नायक मा.कांशीराम साहेबांचा विचार घेवून जयेश अहिरे हे आपली वाटचाल करीत आहेत. जनसामान्या विषयी कमालीची अस्था आहे.अश्या माझ्या हरहुन्नरी मित्राला सामाजिक,राजकीय कार्य करण्यासाठी खूप - साऱ्या शुभेकच्या.

            शब्दरचना सुभाष गाडे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत क्षीरसागर

 साप्ताहिक शिवकाळ.                    संस्थापक संपादक सुभाष गाडे  नोंदणी क्रमांक महा/मराठी३७९१६ पुणे(शिवकाळ न्युज) निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृ...