२८ सप्टेंबर २०२०

B.R.S.P च्या वतीने मावळ तहसील समोर निदर्शनं आंदोलन

मावळ - कोरोना लॉक डाऊन मुले रोजगार 
हीरावलेल्या जनतेचे वीज बिल स्थिती पूर्व पदावर 
येईपरयंत माफ करावे -यासाठी मावळ तहसीलदार यांचे कार्यालयासमोर निदर्शने करून मा.मुख्यमंत्री,मा.उपमुखमंत्री,ऊर्जामंत्री व एम.एस. एबी चे मुख्यव्यवस्थापक यांना तहसीलदार मावळ यांचेमार्फत निवेदन देण्यात येणार आहे.
आम्ही महाराष्ट्रातील नागरिक आपणास सूचित करीत 
आहोत की,मा.पंतप्रधानांनी कोणतीही पूर्वसूचना न देता
अचानक कोरोना जागतिक महामारिमुळे मोठ्या 
प्रमाणात जनता मृतीमुखी पडण्याची भीती असल्याचे 
स्पष्ट करून  २३मार्च २०२०पासून देशभर लॉक डाऊन घोषित केले.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बंद होवून 
या काळात आपल्या सरकारने गरजू गरिबांसाठी 
मोफत धान्य , अन् वाटप योजना ,शिव थाळी अश्या अनेक योजना राबवल्या .परंतु या काळात असंख्य
लोक वीज बिल भरू शकत नव्हते तरीही काही ग्राहक 
ऑनलाईन वीज बिल भरत होते.असे असतानाही 
या महिन्यापासून अदा नी व इतर वीज कंपन्यांनी रोजगार गेलेल्या ,वेतन कपात वंचित झालेल्या जनतेला पुरतेच लुटायचे षडयंत्र रचले आहे.
            सदर कंपन्यांनी प्रत्यक्ष मिटर रीडिंग न घेता 
अंदाजे अवाच्या सवा वीजबिल पाठवल्याने जनता हवालदिल झाली असून जनतेमध्ये प्रचंड असंतोष 
धुमसत आहे सदर वीजबिल रद्द करण्यात यावीत.
            ज्यांनी वीज कनेक्शन कापण्याच्या भीतीपोटी 
वीज बिल भरली आहेत ती रक्कम त्यांना रिफंड करण्यात यावी .तरी आपण या लुटारू वीज कंपन्यांवर 
त्वरित कारवाई करून त्यांची ही अवाच्य सव्वा वीजबिल रद्द करावी.तसेच लोकांचा रोजगार पूर्ववत 
होईपर्यंत वीजबिल माफ करावीत आणि जनेमध्ये 
खदखद नाऱ्या असंतोषाचे पडसाद उमटण्याची वाट न पाहता त्यावर फुंकर घालवी .यासाठी जनतेच्या व बहुजन रीपब लिकन सोशलिस्ट पार्टी पुणे ग्रामीण यांच्या वतीने दिनांक 1/10/2020  रोजी तीव्र निदर्शनं
आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनाचे नेतृत्व 
पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा.किरण दादा साळवे मावळ तालुका अध्यक्ष संतोष भालेराव,
मावळ तालुका महासचिव मा.सुभाषराव गाडे,
तालुका कोषाध्यक्ष गणेश वाघमारे ,तालुका उपाध्यक्ष अनिल बाविस्कर हे करणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत क्षीरसागर

 साप्ताहिक शिवकाळ.                    संस्थापक संपादक सुभाष गाडे  नोंदणी क्रमांक महा/मराठी३७९१६ पुणे(शिवकाळ न्युज) निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृ...