१६ ऑक्टोबर २०२०

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत करावी - युवानेते सुखदेव पाटील

 जुजारपुर (प्रतिनिधी)सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले जुजारपुर हे गाव.. यंदा या गावाला परती चा पाऊस चांगला झाल्याने पूरस्थिती  उद्भवलेली आहे.सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे

जुजारपुर व जूनोनी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.या गावांना जोडणारा जुजारपुर ओढ्याला  खूप पाणी साचले आहे.या मुसळधार पाऊसा मुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे.घरांची पडझड  तसेच  डाळिंब,ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे हा पूल ओलांडून येत असताना दोन दुचाकी वाहने पाण्यात वाहून गेली आहेत तर दोन नागरिकांचे जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. कोणत्याही प्रकारची वित व जीवितहानी होवू नये याकरिता नदी व ओढ्या लागत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षिततेचा ईशारा देण्यात आलेला आहे.

                  सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पाऊसाने  ऊस,डाळिंब व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .शासनाने त्वरी त पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत करावी.व सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जुजारपुर येथील युवानेते सुखदेव समृता पाटील यांनी केली आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत क्षीरसागर

 साप्ताहिक शिवकाळ.                    संस्थापक संपादक सुभाष गाडे  नोंदणी क्रमांक महा/मराठी३७९१६ पुणे(शिवकाळ न्युज) निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृ...