१० ऑक्टोबर २०२०

इंदापूर येथे कामधेनू ज्ञानदीप इन्स्टिट्यूट चा शुभारंभ

 इंदापूर (प्रतिनिधी) कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ ,मुंबई आणि धनश्री मल्टिपर्पज यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ११ऑक्टोबर २०२० रोजी इंदापूर येथे धनश्री मल्टिपर्पज कार्यालय शेजारी कामधेनू इन्स्टिट्यूट चा शुभारंभ इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा मा.अंकिताताई शहा यांचे शुभहस्ते आयोजित केला आहे.स्वाभिमानी स्वयंपूर्ण ,सामर्थ्यशाली राष्ट्र उभारणी  अभियान अंतर्गत बेरोजगार हाताला कौशल्य प्रदान करून रोजगार उपलब्ध करून देणारा हा एक शैक्षणिक प्रकल्प आहे.

        बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ व धनश्री मल्टी सर्व्हिसेस चे संस्थापक अध्यक्ष  मा.संजयजी रणदिवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात लवकरच सुरू होत असलेले कमवा आणि शिका योजनेअंतर्गत हॉटेल मॅनेजमेंट फ्री प्रशिक्षण आहे. होतकरू विद्यार्थी,युवकांनी याचा लाभ    घ्यावा.असे आवाहन कामधेनू इन्स्टिट्यूट च्या संचालक सौ.सुजाता गलांडे,धनश्री मल्टिपर्पज चे कार्यालय प्रमुख महेश सर डे (सर),धनश्री मल्टिपर्पज कार्यवाहक प्रताप रणदिवे ,सहकार्यवाह विकी अडसूळ   संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख अभी गलांडे यांनी केले आहे.

         या शुभारंभ कार्यक्रमासाठी धनश्री मल्टी सर्व्हिसेस  चे व्यवस्थापकीय संचालक दीपक काळे(सर),महाराष्ट्र प्रकल्प संचालक तानाजी पडवळ (सर),पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प संचालक अजितजी केळकर(सर) उपस्थित राहणार आहेत.मास्क चा  वापर करून व सामाजिक अंतर पाळून सहकार्य करावे असे आयोजक यांनी कळविले आहे.

०८ ऑक्टोबर २०२०

सामाजिक कार्यकर्ता जयेश अहिरे

 खानदेशातील एक युवक नोकरीच्या हेतूने पुण्यात दाखल झाला.कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट संघटना च्या बळावर सहजपणे पूनेकरात मिसळतो.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेला सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेला एक हरहुन्नरी युवक जयेश अहिरे. उत र महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेले धुळे हे त्यांचे मुख्य गाव.येथेच १०पर्यंतचे शिक्षण झाले.तर १२चे शिक्षण चंद्रकांत दांगट - पाटील महाविद्यालय वडगाव बुद्रुक येथून पूर्ण केले. राष्ट्रीय छात्र सेनेत सक्रिय सहभागी असल्यामुळे २००९चे महाराष्ट्राचे राज्यपाल एस. सी.जमीर यांना सलामी शस्त्र अर्पण करण्याचा मान जयेश अहिरे यांना महाविद्यालयातर्फे मिळाला. थलसेना कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेतल्याने पिस्तुल चालवण्याचे ज्ञान आहे.                  समाजसेवेचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता जयेश अहिरे यांना धुळे जिल्हा समाज रत्न पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू म्हणजे ते एक सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.हडपसर येथील एस.पी.इंनफोसिटी या कंपनीने त्यांना सर्प मित्र म्हणून गौरव केला आहे.रुद्र ढोल ताष्या पथकाच्या माध्यमातूनही सामाजिक कार्य करीत आहेत.बळीराजा पार्टी उतर महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख यापदावर कार्यात आहेत.तसेच पत्रकारिते च्या माध्यमातूनही काम करीत आहेत.केंद्रीय पत्रकार संघटनेचे पुणे जिल्हा संघटक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.बहुजन नायक मा.कांशीराम साहेबांचा विचार घेवून जयेश अहिरे हे आपली वाटचाल करीत आहेत. जनसामान्या विषयी कमालीची अस्था आहे.अश्या माझ्या हरहुन्नरी मित्राला सामाजिक,राजकीय कार्य करण्यासाठी खूप - साऱ्या शुभेकच्या.

            शब्दरचना सुभाष गाडे 

०७ ऑक्टोबर २०२०

बहुजन रेपबलिकान सोशलिस्ट पार्टी च्या निवडी संपन.

तळेगाव  दाभाडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानी झालेल्या बैठकीत बहुजन रीपबलिकान सोशलिस्ट पार्टी च्या पदाधिकारी  निवडी जाहीर केल्या . पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किरण (दादा) साळवे यांनी  पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अडवोकेट सुरेशजी माने सर यांच्या आदेशानुसार  बहुजन रीपबलिकान सोशलिस्ट पार्टी मावळ  तालुका अध्यक्ष पदी मा.संतोष भालेराव,मावळ तालुका उपाध्यक्ष पदी अनिल बाविस्कर,मावळ तालुका महासचिव पदावर पत्रकार सुभाष गाडे यांची नियुक्ती पत्र देवून निवड केली. यावेळी पक्ष्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष धीरज बगाडे ,पुणे शहर अध्यक्ष जयंत चींचोलीकर ,बामसेफ चे मा. रवी (दादा)कांबळे उपस्थित होते.   

यावेळी बोलताना किरण (दादा) साळवे म्हणाले की  लोकशाहीमध्ये प्रभावी विरोधी पक्ष असावा लागतो पण तसे काम आपल्या देशातील विरोधी पक्ष्य करत नाहीत.आज जरी brsp हा पक्ष महाविकास आघाडी मध्ये घटक पक्ष्य आहे तरीपण लोकांच्या  प्रश्नांसाठी आम्ही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अडव्होकेट सुरेश जी माने सर यांच्या आदेशानुसार  रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.उत्तरप्रदेश मधील हत रस जिल्ह्यातील कु. मनीषा वाल्मिकी या तरुणीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी पक्ष्याचे मावळ तालुका कोषाध्यक्ष गणेश वाघमारे,तळेगाव शहर अध्यक्ष मा.विनोद कळेबाग,राजू थोरात,रेश्मा बाविस्कर, उपस्थित होते.

०२ ऑक्टोबर २०२०

हतरस घटनेवरून देशात संतापाची लाट आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.

 उत्तरप्रदेश मधील हतरस येथील कुमारी मनीषा या  दलीत तरुणीवर अमानवी ,पाशवी अत्याचार करून तिचा निर्दयपणे हत्या  केली .यावरून देशात संतापाची लाट पसरली आहे .मानवतेला काळीमा फासणारी ही  घटना आहे.तरीही तेथील स्थानिक पोलीस हे पीडित कुटुंबास नाहक त्रास देत आहेत.माध्यमांच्या प्रत्तीनिधी  ना तिथे व्र त संकलन करण्यापासून रोखल जात आहे .हेच का भारतीय जनता पार्टी चे अच्ये दिन.? असा प्रश्न जनता विचारत आहे.एवढ्येच नाही तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते मा.राहुल गांधी व मा.प्रियांका गांधी -वढेरा हे बहीण भाऊ पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यास जात होते.त्यांनाही पूलीसानी जावू दिले नाही.एवढी दडपशाही पोलीस कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत? 

   हात रस  येथील घटनेवरून भाजप सोडून सर्व पक्ष  जाती ,धर्मातील नागरिक संताप व्यक्त करून पीडित भगिनिस न्याय मिळावा  दोशी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन  करीत आहेत.  बेटी बचाव बेटी पाढाव चा नारा देवून सतेत्त आलेल्या व अश्या अमानविय कृत्य करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणार्या भाजपा सरकारला इथली मायबाप जनता धडा शिकवला शिवाय राहणार नाही. 

      अभिनेत्री कंगना राणावत साठी आकांडतांडव करून तिला पाठींबा देणारे अता मूग गिळून गप्प का बसलेत.का कु.मनीषा वाल्मिकी भारताची कन्या नाही का?पीडित कुटुंबास घरी कोंडून ठेवून त्यांच्या परस्पर अंतिम संस्कार करण्याची एवढी घाई उतर प्रदेश  पोलिसांनी कश्यासाठी  केली गेली? उपस्थित पोलिस फक्त एवढेच सांगायचे की आम्हाला हे सर्व आदेश आहेत .पण कोणाचे आदेश आहेत हे नाव सांगत नव्हते.

हे सगळे पोलिस बळाचा वापर करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न उत र प्रदेश पोलिस करीत आहेत.पीडित कुटुंबाचा,लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच  जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तेथील योगी सरकारकडून केला जात आहे.

  सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी.अशी मागणी देशभरात जोर धरक आहे. निर्भया च्या वकील मा.adv सीमा कुशवाह यांनी मनिषाची केस लढणार आसून सोडणार नाही.

अशी तंबी दिली आहे. पीडित युवती ला न्याय मिळावा व नराधम ,आरोपीस फाशी शिक्षा मिळावी.

     

  


२८ सप्टेंबर २०२०

B.R.S.P च्या वतीने मावळ तहसील समोर निदर्शनं आंदोलन

मावळ - कोरोना लॉक डाऊन मुले रोजगार 
हीरावलेल्या जनतेचे वीज बिल स्थिती पूर्व पदावर 
येईपरयंत माफ करावे -यासाठी मावळ तहसीलदार यांचे कार्यालयासमोर निदर्शने करून मा.मुख्यमंत्री,मा.उपमुखमंत्री,ऊर्जामंत्री व एम.एस. एबी चे मुख्यव्यवस्थापक यांना तहसीलदार मावळ यांचेमार्फत निवेदन देण्यात येणार आहे.
आम्ही महाराष्ट्रातील नागरिक आपणास सूचित करीत 
आहोत की,मा.पंतप्रधानांनी कोणतीही पूर्वसूचना न देता
अचानक कोरोना जागतिक महामारिमुळे मोठ्या 
प्रमाणात जनता मृतीमुखी पडण्याची भीती असल्याचे 
स्पष्ट करून  २३मार्च २०२०पासून देशभर लॉक डाऊन घोषित केले.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बंद होवून 
या काळात आपल्या सरकारने गरजू गरिबांसाठी 
मोफत धान्य , अन् वाटप योजना ,शिव थाळी अश्या अनेक योजना राबवल्या .परंतु या काळात असंख्य
लोक वीज बिल भरू शकत नव्हते तरीही काही ग्राहक 
ऑनलाईन वीज बिल भरत होते.असे असतानाही 
या महिन्यापासून अदा नी व इतर वीज कंपन्यांनी रोजगार गेलेल्या ,वेतन कपात वंचित झालेल्या जनतेला पुरतेच लुटायचे षडयंत्र रचले आहे.
            सदर कंपन्यांनी प्रत्यक्ष मिटर रीडिंग न घेता 
अंदाजे अवाच्या सवा वीजबिल पाठवल्याने जनता हवालदिल झाली असून जनतेमध्ये प्रचंड असंतोष 
धुमसत आहे सदर वीजबिल रद्द करण्यात यावीत.
            ज्यांनी वीज कनेक्शन कापण्याच्या भीतीपोटी 
वीज बिल भरली आहेत ती रक्कम त्यांना रिफंड करण्यात यावी .तरी आपण या लुटारू वीज कंपन्यांवर 
त्वरित कारवाई करून त्यांची ही अवाच्य सव्वा वीजबिल रद्द करावी.तसेच लोकांचा रोजगार पूर्ववत 
होईपर्यंत वीजबिल माफ करावीत आणि जनेमध्ये 
खदखद नाऱ्या असंतोषाचे पडसाद उमटण्याची वाट न पाहता त्यावर फुंकर घालवी .यासाठी जनतेच्या व बहुजन रीपब लिकन सोशलिस्ट पार्टी पुणे ग्रामीण यांच्या वतीने दिनांक 1/10/2020  रोजी तीव्र निदर्शनं
आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनाचे नेतृत्व 
पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा.किरण दादा साळवे मावळ तालुका अध्यक्ष संतोष भालेराव,
मावळ तालुका महासचिव मा.सुभाषराव गाडे,
तालुका कोषाध्यक्ष गणेश वाघमारे ,तालुका उपाध्यक्ष अनिल बाविस्कर हे करणार आहेत.


पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणार -धनराज विसपुते

 साप्ताहिक शिवकाळ  Rni rajistration no Mah/mar ३७९१६ मुख्य संपादक - सुभाष अशोक गाडे  संपर्क /9881751643,9822982750 (बी.ए.ग्रामीण पत्रकारिता ...