०६ ऑगस्ट २०२३

डोळे येण्याची साथ (आय फ्ल्यू )

साप्ताहिक शिवकाळ(mah/mar३७९१६

मुख्य संपादक सुभाष गाडे

(बी.ए.ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद)

9881751643

महाराष्ट्रामध्ये डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे.डोळे येण्याचा संसर्ग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत आहे.त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे बनले आहे.डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.

        कसा होतो संसर्ग
           डोळे येण्याचा संसर्ग प्रथम एकाच डोळ्याला होतो.एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होतो.एका व्यक्तीचे डोळे येवून गेले की,पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही असा लोकांचा गैरसमज असतो त्यामुळे निष्काळजी पण केला जातो पण तसे नसते.एकदा संसर्ग होवून गेल्या नंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होवून डोळे येवू शकतात.
        काय काळजी घ्यावी
         1)डोळे सतत स्वच्छ पाण्याने     धुवावेत.
२)प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे.
३) कुटुंबातील सदस्या पासून दूर राहावे.
४)तेलकट खाणे टाळावे.
५)तज्ञ डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
६)डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये.
७)डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे,टॉवेल इतरांनी वापरू नयेत.
           असा ओळखा संसर्ग
      १)डोळे लाल होणे.
       २)पापण्या एकमेकांना चिकटने.
        ३)डोळ्यात सतत काहीतरी गेल्यासारखे वाटणे
४)डोळ्यातून सतत पाणी येणे.
५)डोळ्यांना सूज येवून डोळे लाल होणे.
६)डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणे.
७)डोळ्यांना खाज येणे.
८)डोळे जड वाटणे.
९) तीव्र प्रकाश सहन न होणे.

       अश्याप्रकरे आपण आपल्या डोळ्यांची  काळजी घेवू शकतात.



२१ सप्टेंबर २०२२

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विद्रोही विचारांचे 

साप्ताहिक शिवकाळ 

मुख्य संपादक - सुभाष गाडे(बी.ए.)

     रजि.नंबर -महा/मराठी२०११/३७९१६    मोबाईल नंबर (९८८१७५१६४३)
पुणे (शिवकाळ न्युज) आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक संचालनालय , मुंबई यांनी पुणे येथील  येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले.गणेश वंदना, तालवाद्य वादन, राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल गीते , पोवाडा सादर करण्यात आला.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आरयन देसाई यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले.सदर सांस्कृतिक कार्यक्रम शाहीर श्रीकांत रेणके व सहकारी ढोलकी राहुल कुलकर्णी सिंथेसायसर दिपक पवार,भरत शर्मा,राहुल पवार यांनी साथसंगत केली.
       यावेळी प्रमुख अतिथी श्री संदीप ओव्हाळ, अँड राजेश महामुन कर , रोहीदास मदने,गंगाराम जाधव, सुभाष जाधव,शेखर गोरगले,सुरेश चव्हाण, शांताराम गोपने, प्रशांत गोपने, महेश महसुडगे,आरती ताई साठे,हिराजी बुवा,संदिप शेळके,भूषण कांबळे, राजाराम निकम इत्यादी उपस्थित होते.सांगता महाराष्ट्र गीताने झाली.मोठया संख्येने श्रोते उपस्थित होते.

१४ सप्टेंबर २०२२

नेतेमंडळी आणि शासकीय अधिकारी यांनी जुजारपूर गावात न येण्याचं गावकरी यांचं आवाहन

साप्ताहिक शिवकाळ

संस्थापक संपादक - सुभाष गाडे (बी.ए.)

रजि.नंबर महा/मराठी २०११/३७९१६ मो.न.९८८१७५१६४३

जुजारपूर हे सांगोला तालुक्याच्या पश्चिमेला असलेल गाव.या गावाला लागुन असलेल्या ओढ्याला सहा ते सात दिवस झाले पावसामुळे पाणी वाहत आहे.तयामुळे वाडी वस्तीवरील नागरीक,शालेय मुले,दुध उत्पादक यांचं खुप हाल होत आहेत.ही वार्ता सोशल मिडीया मुळे सगळीकडे पसरत आहे.दुसरा रस्ता नसल्यामुळे गावकरी खुप त्रस्त झाले आहेत. नागरीकांच्या वतीने जुजारपूर येथील शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी शासकीय अधिकारी व नेतेमंडळी यांनी गावात न येण्याचे आवाहन केले आहे.ओढयातील पाणी कमी होत नाही तोपर्यंत तरी आमच्या गावाला भेट देऊ नये असं ग्रामस्थ बोलतात.कारण नेते मंडळी येतात आणि फक्त आश्वासना पलिकडे काही हाती लागत नाही.

          गावातुन वाडी वस्त्यांमध्ये जाणारे रस्ते चांगले नाहीत.लोकप्रतिनिधी कडे विचारना केली तर करून टाकु,बघू अशी उत्तरे ठरलेलीच...ही गावकऱ्यांची फसवणूक आहे.आमचया गावातील ओढ्याला पाणी आल्याने ५0 % संपर्क बंद आहे.

    कुणाची गिनीज बुकात नोंद तर कुणी काय डोंगर काय झाडी या डायलाग ने महाराष्ट्र भर प्रसिद्धी होत आहेत.या ओढयातील पाण्यामुळे आमच्या गावातील मुलांना शाळेत येणापासुन वंचित रहावे लागत आहे.आमचे लोकांनी पिढ्या न पिढ्या तुम्हा नेते मंडळींच्या झेंडे उचलण्यात घालवल्या तेव्हा जागे व्हा आणि सत्तेला प्रश्न विचारणारे नागरीक बना असे सुशिक्षित नागरीकातून चर्चा चालू आहे.



०३ सप्टेंबर २०२२

समाजसेवेची तपस्या

 साप्ताहिक शिवकाळ

संपादक सुभाष गाडे 
(बी. ए.ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद)
मोबाईल नंबर -9881751643
Rag.No -mah/mar ३७९१६

मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन 

कुढल्याही गोष्टीची आवड माणसात जिद्द , चिकाटी आणि अथक परिश्रम निर्माण करण्याची क्षमता निर्माण करते.खानदेशातील एक तरुण नोकरीच्या उदेशाने पुण्यात दाखल होतो.आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या बळावर तो सहजपणे पूनेकरात मिसळतो.धुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्ता मा.जयेश अहिरे यांच्याविषयी....
               महाविद्यालयांमध्ये शिकत असताना आपल्या आई वडिलांकडून समाजकार्याचे बाळकडू मिळाले.कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही जिद्दीने सामाजिक कार्य करायला सुरुवात केली.कलेची आवड असल्यामुळे सर्व प्रथम रुद्र ढोल ताशा पथकाची स्थापना केली.बळीराजा पार्टी,पत्रकार संघटना,बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ यांच्या माध्यमातून लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेवून त्यावर आपले कार्य सुरू केले.अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याविषयी आवाज उठवला.संपूर्ण महाराष्ट्रात तगडा जनसंपर्क असलेल्या मा.जयेश (भाऊ)अहिरे यांनी मग  मागे वळून पाहिले नाही....ते नेहमी बोलतात की समाजकारण हे मोबाईल व्हॉट्स अप वर डीपी/स्टेटस ठेवून करता येत नाही.त्यासाठी लोकशाही मार्गाने लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात.आपला बहुमूल्य वेळ व पैसा खर्च करावा लागतो.तेव्हा लोकसेवा होते.
          मा.जयेश अहिरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.एनसीसी मध्ये थल सेना कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेतल्याने त्यांना बंदूक चालवण्याचे ज्ञान अवगत आहे. सन २००९ चे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल मा.एस. सी.जमीर यांना सलामी शस्त्र अर्पण करण्याचा सन्मान त्यांना महाविद्यालय तर्फे मिळाला होता.समाजकार्य करण्याबरोबरच ते एक सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध आहेत.एस.पी.इन्फोटेक या कंपनीने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असताना जयेश अहिरे यांना अनेकदा धमकवण्यात आले,खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला पण  ते डगमगले नाहीत सामान्य जनतेशी कायम नाळ जोडलेली आहे.
               दिनांक २६नोव्हेंबर २०२०रोजी भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली.आणि याच दिवशी सर्वानुमते जयेश (भाऊ) अहिरे यांची राष्ट्रीय मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तोच सामाजिक कार्याची धडाकेबाज सुरुवात झाली.संस्थेचे कार्य महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात,उत्तरप्रदेश, दिल्ली येथे सुरू आहे.फ्रान्स,आफ्रिका या देशात सुद्धा मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन च्य माध्यमातून लोकसेवा सुरू आहे.जागतिक स्तरावर संस्था समाजसेवेची तपस्या करून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणील यात तिळमात्र शंका नाही.
         संस्थकडून राबविले जात असलेले विविध उपक्रम
       १)महिलांसाठी मोफत शिवणकला ,/पार्लर        प्रशिक्षण,
२)अल्पदरात योगा, कराटे प्रशिक्षण
३)गाव तिथे वाचनालय
४)माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत नको असलेले द्या व हवे असलेले घेवून जा.
५)जनता दरबार 
          अश्याप्रकरे जनसेवा करण्याचा संस्थेचा उपक्रम सुरू आहे.समाजातील बुद्धिजीवी वर्गाने सढळ हाताने मदत केल्यास आमच्या कार्याला अजून बळकटी येईल.आपण केलेली मदत आयकर कायद्याचा कलम ८०gनुसार करसवलती पात्र असेल.तर कृपया संस्थेस मदत करावी अशी विनंती.
        
                   



२३ ऑगस्ट २०२२

दीपक काळे (सर)शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित

 साप्ताहिक शिवकाळ रजी.नं.mah/mar/2011/37916.

मुख्य संपादक -सुभाष गाडे (बी.ए.ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद).मोबाईल न.९८८१७५१६४३

दीपक काळे शैक्षणिक  पुरस्कारांनी सन्मानित

बेळगांव (शिवकाळ न्युज)बेळगांव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२२रोजी राष्ट्रीय संस्कृती संमेलन संपन्न झाले.या संमेलनाचे आयोजन शाम  रंजन फाऊंडेशन ,मुंबई विद्यार्थी विकास अकादमी,महाराष्ट्र यांनी केले होते.यात  गुनिजनांची समरसता व गुणवत्ता पूर्ण कार्यक्षम कार्यातून आपला देश जागतिक महासत्ता म्हणून उदयास येईल यावर दृढनिश्चय करून कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा कौतुक व सन्मान सोहळा आयोजित केला होता.यावेळी मेळघाट (अमरावती)येथील थोर समाजसेवक व पद्मश्री पुरस्काने सन्मानित मा.डॉक्टर श्री रवींद्र कोल्हे व माननीय डॉक्टर  सौ.स्मिता कोल्हे यांच्या हस्ते कला,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उलेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

         यावेळी स्वरा स्पोकन इंग्लिश व परसनालिटी डेव्हलपमेंट संस्थेचे प्रमुख माननीय दीपक काळे (सर)यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार मा.थोर समाजसेवक पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व माननीय.डॉक्टर सौ.स्मिता कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आला.दीपक काळे सर हे दहा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी हजारो लोकांच्या मनातील इंग्लिश भाषेची भीती दूर करून त्यांना इंग्लिश बोलायला शिकविले आहे.दर रविवारी ते संस्थेच्यावतीने व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे करतात.

           या राष्ट्रीय संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष लेखक/चित्रपट निर्माता संदीप राक्षे हे होते. संमेलनाचे उद्घाटक अशोक दाभोलकर (माजी मुख्य पंच भारत पाकिस्तान शूटिंग बॉल, वनडे)यांनी केले.प्रमुख पाहुणे संमोहन उपचार तज्ञ दीपक बोडरे,अभिनेत्री रिया पाटील,व पुरस्कार निवड समिती अध्यक्ष थाबाजी शिंदे हे होते या राष्ट्रीय संस्कृती संमेलनाचे आयोजन माननीय कृष्णा बामणे,विद्यार्थी विकास अकादमी चे प्रमुख प्रा.डॉक्टर बी. एन.खरात,शाम रंजन फाऊंडेशन च्या अध्यक्षा माननीय स्वाती पवार यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण हजारो प्रयोग करून लाखो लोकांचे मनोरंजन करणारे गोवा येथील अंतर राष्ट्रीय जादूगार प्रेमानंद उर्फ प्रेम आनंद पाटील हे उपस्थित होते.

१६ ऑगस्ट २०२२

उपसरपंचपदी पवण गाडे

विद्रोही विचारांचे 

साप्ताहिक शिवकाळ

मुख्य संपादक सुभाष गाडे 
मोबाईल नंबर 9881751643
RNI .No.-mah/mar/2011/37916


सांगोला (शिवकाळ न्युज)सांगोला तालुक्यातील जूजार पूर हे गाव राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असते. या तालुक्यातील राजकारणात शेतकरी कामगार पक्ष या प्रादेशिक पक्ष्याला जनाधार खूप मिळालेला आहे.कारण या पक्षात निष्ठावंताची कदर केली जाते.व योग्य असा न्याय दिला जातो.त्यामुळे सांगोल्यात शेकाप हा पक्ष कष्टकरी,कामगार,उपेक्षित,शेतकरी यांनी टिकवून ठेवला आहे.स्वर्गीय आमदार गणपतराव जी देशमुख यांनी एकच पक्ष एकच मतदार संघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विश्र्विक्रम नोंदवलेला आहे.
     अनुसूचित जातीसाठी आरक्षण नसतांना सुधा पवन गाडे यासारख्या तरुण कार्यकर्त्याला शेतकरी कामगार पक्षाने उपसरपंच पदावर काम करण्याची संधी देवून आपला पुरोगामी बाणा दाखवून दिला आहे.निवड प्रसंगी बोलताना मिळालेल्या उपसरपंच पदाचा उपयोग गावच्या,समाजाच्या हितासाठी करणार आहे असे त्यांनी साप्ताहिक शिवकाळ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
      जुजारपुर चे विद्यमान सरपंच इंदुबाई माने य आहेत.तर मावळते उपसरपंच श्रावण वाघमोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर सर्वानुमते पवन गाडे यांची निवड करण्यात आली आहे.मुळात पवन गाडे हे राजकारणात कमी व समाजकार्यात जास्त अग्रेसर असतात. अस्तित्व समजविकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात समाजक्रांती ची मोठी चळवळ उभी केली असून तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार पण मोठा आहे.स्त्री पुरुष समानता,शेतकऱ्यांचे विविध प्रश्न,अन्याविरुध्य पेटून उठण भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढा हे त्यांच्या कामाचे आवडते विषय आहेत.
             पवन गाडे यांची निवड उपसरपंच या पदावर होण्यासाठी मा.गजेंद्र हिप्परकर,बाळासाहेब पाटील,पिंटू माने,राजेंद्र पाटील,मारुती हिप्परकर,पांडुरंग वाघमोडे, दादासो खडके,सुखदेव पाटील,श्रीमंत पाटील,तुकाराम पाटील,गुलाब चौगुले,बिरुदेव चौगुले, कल्लापा गाडे,सागर पाटील,संजय ओव्हाळ,सतीश गाडे यांनी मोलाचे योगदान दिले. सदर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुजार पुर येथे विशेष सत्कार करून पुढील कारकिर्दी शुभेक्ष्या दिल्या.

१८ ऑक्टोबर २०२०

तलाठ्यांनी कार्यरत गावातच निवासी राहणे बंधनकारक

 पुणे :तलाठी हा जमीन महसूल व्यवस्थेतील एक महत्वाचा कमचारी आहे.गावपातळीवर शासन व जनता यातील एक महत्वपूर्ण दुवा म्हणून तलाठी  काम करतो.तलाठ्यांना आजही ग्रामीण भागात सन्मानपूर्वक भाऊसाहेब असेच बोलले जाते.गाव काम गार तलाठी निवड ही  जिल्हाधिकाऱ्यां च्या  अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती मार्फत लेखी परीक्षा घेवून केली जाते.गावपातळीवरील जमिनींचे अभिलेख सत्तत अद्यावत ठेवणे शासनाच्या नियमा नुसार ,नागरिकांना विविध दाखले - उतारे देणे,शिधा पत्रिका धारकांची सूची तयार करणे,शासनाच्या गौण खनिज संपत्तीचे रक्षण करणे इत्यादी कामे करावी लागतात.तलाठ्यांच्या कार्यक्षेत्र असते त्याला सज्जा असे म्हणतात.

                  पण असे असूनही हे तलाठी भाऊसाहेब अनेकदा कार्यालयात सापडत नाहीत.मीटिंग असल्याची करणे देत बाहेरच जास्त वेळ असतात.यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते.याबतच्या तक्रारी अनेकदा शासनाकडे गेल्या आहेत.त्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. तलाठी ज्या गावात/सज्जा मध्ये कार्यरत आहे तिथेच राहणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्य महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी विष्णु पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

 तलाठी ज्या गावात कार्यरत आहे त्या कार्यालयाच्या आवारात   असलेले दोरे व बैठका यांचा तपशील लावावा.तसेच तलाठ्यांनी त्यांची कर्तव्ये व जबाबदारी यांचा  फलक कार्यालयात लावणे. तलाठी ,मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक फलकावर लिहिणे आवश्यक आहे. विविध शासकीय योजना व विविध उतारे व त्यासाठी लागणारा कालावधी यांची माहिती फलकावर लिहावी.

             तलाठ्यांनी खाजगी व्यक्तीला कामास ठेवू नये असे झाल्यास संबंधित  तलाठी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध दाखले यांची सूची व दरपत्रक कार्यालयात दर्शनी भागातील फलकावर लावणे बंधनकारक असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

               

१६ ऑक्टोबर २०२०

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत करावी - युवानेते सुखदेव पाटील

 जुजारपुर (प्रतिनिधी)सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले जुजारपुर हे गाव.. यंदा या गावाला परती चा पाऊस चांगला झाल्याने पूरस्थिती  उद्भवलेली आहे.सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे

जुजारपुर व जूनोनी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.या गावांना जोडणारा जुजारपुर ओढ्याला  खूप पाणी साचले आहे.या मुसळधार पाऊसा मुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे.घरांची पडझड  तसेच  डाळिंब,ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे हा पूल ओलांडून येत असताना दोन दुचाकी वाहने पाण्यात वाहून गेली आहेत तर दोन नागरिकांचे जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. कोणत्याही प्रकारची वित व जीवितहानी होवू नये याकरिता नदी व ओढ्या लागत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षिततेचा ईशारा देण्यात आलेला आहे.

                  सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पाऊसाने  ऊस,डाळिंब व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .शासनाने त्वरी त पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत करावी.व सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जुजारपुर येथील युवानेते सुखदेव समृता पाटील यांनी केली आहे.     

१५ ऑक्टोबर २०२०

मोफत हॉटेल व्यवस्थापन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

 इंदापूर (प्रतिनिध) संपूर्ण देशातील असंघटित लोकांसाठी कार्य करणाऱ्या बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघाने बेरोजगार हाताला कौशल्य प्रदान करून रोजगार मिळवून देण्याचा कार्यक्रम हाती  घेतला आहे.हा कार्यक्रम कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुबई यांच्या सहकार्याने व कामधेनू इन्स्टिट्यूट तर्फे सुरू करण्यात आला आहे.या मोफत हॉटेल प्रशिक्षण कोर्स मूळे महाराष्ट्रातील पन्नास हजार तरुणांकडे रोजगाराची संधी चालून आलेली आहे या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मा.संजय रणदिवे यांनी केले आहे.

                     हा  प्रशिक्षण कार्यक्रम इंदापूर नगर परिषदेच्य नगराध्यक्षा मा.अंकिता ताई शहा यांचे शुभहस्ते संपन झाला.यावेळी धनश्री परिवाराचे व्यवस्थापकीय संचालक दीपक काळे(सर),महाराष्ट्र प्रकल्प प्रमुख तानाजी पडवळ(सर),बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओव्हाळ,न्यू महाराष्ट्र चॅनल चे संपादक महावीर वांजळे(सर),जिल्हा कोषागार अधिकारी सुरेश साळुंखे(साहेब),पंडित कांबळे,दाजी शिंदे उपस्थित होते.

                सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामधेनू  इन्स्टिट्यूट च्या संचालक सौ.सुजाता गलांडे, धनश्री चे महेश सरडे,प्रताप रणदिवे,अभिजित गलांडे,विक्की अडसूळ,रोहित मुसळे,काका पवार यांनी अधिक परिश्रम घेतले.

१० ऑक्टोबर २०२०

इंदापूर येथे कामधेनू ज्ञानदीप इन्स्टिट्यूट चा शुभारंभ

 इंदापूर (प्रतिनिधी) कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ ,मुंबई आणि धनश्री मल्टिपर्पज यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ११ऑक्टोबर २०२० रोजी इंदापूर येथे धनश्री मल्टिपर्पज कार्यालय शेजारी कामधेनू इन्स्टिट्यूट चा शुभारंभ इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा मा.अंकिताताई शहा यांचे शुभहस्ते आयोजित केला आहे.स्वाभिमानी स्वयंपूर्ण ,सामर्थ्यशाली राष्ट्र उभारणी  अभियान अंतर्गत बेरोजगार हाताला कौशल्य प्रदान करून रोजगार उपलब्ध करून देणारा हा एक शैक्षणिक प्रकल्प आहे.

        बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ व धनश्री मल्टी सर्व्हिसेस चे संस्थापक अध्यक्ष  मा.संजयजी रणदिवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात लवकरच सुरू होत असलेले कमवा आणि शिका योजनेअंतर्गत हॉटेल मॅनेजमेंट फ्री प्रशिक्षण आहे. होतकरू विद्यार्थी,युवकांनी याचा लाभ    घ्यावा.असे आवाहन कामधेनू इन्स्टिट्यूट च्या संचालक सौ.सुजाता गलांडे,धनश्री मल्टिपर्पज चे कार्यालय प्रमुख महेश सर डे (सर),धनश्री मल्टिपर्पज कार्यवाहक प्रताप रणदिवे ,सहकार्यवाह विकी अडसूळ   संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख अभी गलांडे यांनी केले आहे.

         या शुभारंभ कार्यक्रमासाठी धनश्री मल्टी सर्व्हिसेस  चे व्यवस्थापकीय संचालक दीपक काळे(सर),महाराष्ट्र प्रकल्प संचालक तानाजी पडवळ (सर),पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प संचालक अजितजी केळकर(सर) उपस्थित राहणार आहेत.मास्क चा  वापर करून व सामाजिक अंतर पाळून सहकार्य करावे असे आयोजक यांनी कळविले आहे.

पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणार -धनराज विसपुते

 साप्ताहिक शिवकाळ  Rni rajistration no Mah/mar ३७९१६ मुख्य संपादक - सुभाष अशोक गाडे  संपर्क /9881751643,9822982750 (बी.ए.ग्रामीण पत्रकारिता ...